भारतीय संघाला इंदोर कसोटी सामन्यात पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने भारताला 9 विकेट्सने पराभूत केले. तसेच, मालिका 2-1 अशी केली. भारताच्या या पराभवानंतर भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघावर टीका केली. तसेच, त्यांनी हा पराभव अति आत्मविश्वासामुळे झाल्याचे म्हटले. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच सत्रात सात विकेट्स गमावल्या होत्या. यातील पाच विकेट्स या मॅथ्यू कुह्नेमन याने घेतल्या होत्या. त्यामुळे भारताचा पहिला डाव 109 धावांवरच संपुष्टात आला होता.
यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 88 धावांची आघाडी घेतल्यानंतर, भारताचा दुसरा डाव 163 धावांवर संपुष्टात आला. भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या 59 धावा सोडल्या, तर इतर एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना नेथन लायन (Nathan Lyon) याने 8 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकात पूर्ण केले.
काय म्हणाले शास्त्री?
ते म्हणाले की, “हा पराभव अति आत्मविश्वासामुळे झाला आहे. इथे तुम्ही गोष्टी हलक्यात घेता. तुम्ही संधी गमावता. त्यामुळे सामन्यात तुम्ही मागे आहात. मला वाटते की, या सर्व गोष्टींचे संयोजन होते, जेव्हा तुम्ही वास्तवात तुमचे डोके लावता, तेव्हा दिसते की, पहिल्या डावापासून ऑस्ट्रेलियाने भारतावर दबाव बनवलेला.”
सामन्याची स्थिती
इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात संपूर्ण संघ 109 धावांवर ढासळला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 197 धावा करत 88 धावांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावातही भारतीय संघाला झुंज देता आली नाही. त्यांनी 163 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने 76 धावांचे आव्हान 18.5 षटकात 1 विकेट्स गमावून 78 धावा करत पूर्ण केले. (ind vs aus former head coach ravi shastri criticizes rohit sharma team india defeat in indore test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! संघाला टी20 वर्ल्डकपमध्ये घेऊन जाणाऱ्या कर्णधाराची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
कॅप्टन जिनियस! वॉ-पॉंटिंगला न जमलेली कामगिरी स्मिथने पाचव्याच सामन्यात करून दाखवली