भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील तिसरा कसोटी सामना उद्या 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये चाहत्यांमध्ये प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला. ज्यामध्ये टीम इंडियाने पहिला सामना जिंकण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन करत मालिका 1-1 ने बरोबरीत राखली. आता अशा परिस्थितीत गाबा येथे खेळवली जाणारी मालिकेतील तिसरी कसोटी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे. गेल्या दौऱ्यावर टीम इंडियाने याच मैदानावर ऐतिहासिक विजय नोंदवत मालिका जिंकली होती. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात कोणतीही चूक करू इच्छित नाही. खराब हवामानामुळे ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळात व्यत्यय येऊ शकतो.
ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या हवामानाबद्दल सांगायचे तर, हवामानखात्याच्या अहवालानुसार, 14 डिसेंबर रोजी 88 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये पहिल्या सकाळच्या सत्रातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाणेफेकीला विलंब होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय, उर्वरित दिवसातील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, सतत ढग जमा राहतील, त्यामुळे खेळात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ हवामानाचा विचार करून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. जेणेकरून त्यांचे गोलंदाज ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवर असलेल्या आर्द्रतेचा फायदा घेऊ शकतील.
यजमान ऑस्ट्रेलियाने गब्बा कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ॲडलेड कसोटी सामना जिंकूनही संघात एक बदल करण्यात आला असून दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या जागी खेळलेला स्कॉट बोलंडला बाहेर करण्यात आले आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आकाशदीपची एंट्री होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-
IPL 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, दोनदा वर्ल्ड जिंकणाऱ्या खेळाडूची प्रशिक्षकपदी नियुक्ती
विराट कोहली गाबामध्ये पूर्ण करणार ‘अनोखं शतक’, सचिननंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू!
IND vs AUS: टीम इंडियाने गाबा कसोटीत सलामीची जोडी बदलावी? या दोन कारणांमुळे बदलाची शक्यता