---Advertisement---

“त्यानं पाचव्या किंवा ….” , ॲडलेड कसोटीपूर्वी माजी प्रशिक्षकानं रोहित शर्माला दिला सल्ला

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 06 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीच्या स्थितीवर प्रश्न कायम आहेत. पहिल्या कसोटीत सहभागी न झालेल्या रोहित शर्माबाबत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, त्याने दुसऱ्या म्हणजे ॲडलेड कसोटीत त्याने सलामीला येऊ नये.

पर्थ कसोटीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल यशस्वी जयस्वालसोबत सलामीला आला होता. भारताच्या दुसऱ्या डावात दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत 201 धावांची विक्रमी भागीदारी केली.

हे लक्षात घेऊन रवी शास्त्री आयसीसीशी बोलताना म्हणाले, “हे खूप चांगले प्रोत्साहन आहे. कारण त्याच्या गुणवत्तेबद्दल कोणतीही शंका नाही. ओपनिंगमध्ये अनुभव आणि युवा खेळाडूंचा योग्य मिलाफ आहे. त्यामुळे रोहितने मधल्या फळीत खेळावे. त्याला इतका अनुभव आहे की तो संघाला त्याची कुठे गरज आहे. तो त्या ठिकाणी खेळेल. तो कर्णधार देखील आहे. जेव्हा ऑस्ट्रेलिया सारखा देशसमोर विरोधक असतो. तेव्हा रोहित शर्मा आणखी आक्रमकपणे खेळतो. ज्यासाठी तो ओळखला जातो”.

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, केएल राहुलने सलामी करत राहावे. तर रोहित शर्माने पाच किंवा सहाव्या क्रमांकाची जबाबदारी स्वीकारावी. पर्थ कसोटी जिंकण्यात राहुल आणि जयस्वाल यांच्या सलामीच्या भागीदारीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावरही त्याने भर दिला.

तो म्हणाला, “तो (रोहित) खूप अनुभवी आहे. तुम्हाला मधल्या फळीत त्याचा अनुभव हवा आहे. मला वाटते की राहुलने ओपनिंग करावे, कारण रोहितला ऑस्ट्रेलियात येऊन जास्त वेळ झालेला नाही. त्याला (रोहित) पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध लवकर सामना खेळावा लागला. पण मी नक्की म्हणेन की तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो”.

हेही वाचा-

HOCKEY; पाकिस्तानचा धोबीपछाड, भारताने ‘ज्युनियर आशिया कप’ मध्ये सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले
“कसोटी क्रिकेटमध्ये रिषभ पंतने विलक्षण…” माजी दिग्गजाने केले पंतचे कौतुक!
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टँडला ‘या’ खेळाडूंची नावे असणार! केएल राहुल म्हणाला, “एक दिवस माझेही…

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---