बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी उद्यापासून म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली मजबूत ऑस्ट्रेलियाचा सामना करेल. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही सहावी वेळ असेल जेव्हा दोन वेगवान गोलंदाज एकाच कसोटी सामन्याचे नेतृत्व करताना दिसतील.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी स्पर्धेतील 5 पैकी किमान 4 सामने जिंकावे लागतील. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करण्याची सर्वात मोठी जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल. ऑस्ट्रेलियात बुमराहचा उत्कृष्ट फॉर्म कायम राहिला तर तो अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
वास्तविक, जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियन भूमीवर कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 7 कसोटी सामन्यांच्या 14 डावात 21.25 च्या सरासरीने 32 बळी घेतले आहेत. पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतल्यास, तो अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदीला मागे टाकून ऑस्ट्रेलियातील चौथा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरेल. आर अश्विनलाही मागे टाकण्याची बुमराहला चांगली संधी असेल. ऑस्ट्रेलियामध्ये अश्विन भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे. अश्विनला मागे टाकण्यासाठी बुमराहला 7 विकेट्सची गरज आहे. मात्र, अश्विन विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर बुमराहला खूप मेहनत करावी लागणार आहे.
दुसरीकडे अश्विनलाही अनिल कुंबळे आणि कपिल देव यांना मागे टाकण्याची मोठी संधी असेल. अश्विनच्या नावावर ऑस्ट्रेलियात 38 विकेट आहेत. कुंबळेला मागे टाकण्यासाठी अश्विनला 12 विकेट्सची गरज आहे. असे करण्यात तो यशस्वी ठरल्यास ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 50 बळी घेणारा कपिल देव यांच्यानंतरचा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज
51 – कपिल देव
49 – अनिल कुंबळे
38 – आर अश्विन
35 – बिशनसिंग बेदी
32 – जसप्रीत बुमराह
हेही वाचा-
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली! कर्णधारानं दिलं मोठं अपडेट
बुमराह-कमिन्स दोघे मिळून अनोखा विक्रम रचणार, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असे फक्त 5 वेळा घडले
‘माझे मन म्हणतं भारत जिंकेल, पण…’, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी