---Advertisement---

जॉश हेझलवुडने चक्क इतक्यावेळा विराट कोहलीला बाद केले, किंगचा लाजिरवाणा रेकाॅर्ड!

On: शनिवार, नोव्हेंबर 23, 2024 7:22 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी भारताला 150 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 67 धावांत सात विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 83 धावांनी मागे आहे. खेळपट्टीवर गवत असूनही बुमराहने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण या विकेटने गोलंदाजांना अतिरिक्त उसळी दिली. भारताच्या युवा आणि अनुभवी फलंदाजांना यजमान गोलंदाजांचा सामना करता आला नाही. काही काळापासून धावा काढण्यासाठी धडपडणाऱ्या माजी कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पहिल्या डावात तो हेझलवूडच्या एका उसळत्या चेंडूवर झेलबाद झाला.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने 10व्यांदा कोहलीला आपला बळी बनवला आहे. यासह तो कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज टीम साऊदीने विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद केले आहे. त्याने 37 डावात 11 वेळा कोहलीला आपला बळी बनवले आहे. हेजलवूडने 28 डावांत 10 वेळा कोहलीला बाद केले. आहे.

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 37 डावांत कोहलीला 10 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. या यादीत मोईन अलीचेही नाव आहे. त्याने 41 डावात विराट कोहलीला 10 वेळा बाद केले आहे.
ज्या खेळाडूंनी विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद केले

11 – टीम साऊदी (37 डाव)

10- जोश हेझलवूड (28 डाव)*

10 – जेम्स अँडरसन (37 डाव)

10- मोईल अली (41 डाव)

भारतीय संघाच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार जसप्रीत बुमराहने डावाची शानदार सुरुवात केली. त्याने तिसऱ्या षटकात मॅकस्वीनीला बाद करत यजमान संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर टीम इंडियाचा कांगरुंवर दबदबा पाहायला मिळाला. बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतले. भारतासाठी पहिलाच कसोटी सामना खेळणारा हर्षित राणाने देखील 1 बळी घेतला. त्याने ट्रेव्हिस हेडला माघारी पाठवले.

हेही वाचा-

आयसीसी स्पर्धा भारत-पाकिस्तानमध्ये होऊ नयेत, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
IND vs AUS; पंतने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
IND vs AUS; झेल सोडण्यात कोहली पटाईत, पाकिस्तानच्या बाबर आझमलाही टाकलं मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---