भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (22 सप्टेंबर) मोहालीमध्ये सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पाहुण्या संघाने 4 विकेट्सच्या नुकसानावर 166 धावा केल्या आहेत. पण पावसाने मैदानात हजेरी लावल्यामुळे खेळ थांबवला गेला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 35.4 षटकात 4 बाद 166 धावांची खेळी केली. यामध्ये सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने सर्वाधिक 52 धावांचे योगदान दिले. स्टीव स्मिथ याने 41, तर मार्नस लॅबुशेन याने 39 धावांची खेळी करून विकेट गमावल्या. भारतासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पावसापूर्वी 2 विकेट्स घेतल्या आङेत. रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अस्विन यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली आहे. (IND vs AUS Rain has stopped play in Mohali.)
पहिल्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍडम झम्पा.
महत्वाच्या बातम्या –
सेट झालेल्या स्मिथचा त्रिफळा, शमीच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज गुडघ्यांवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा