भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशा बरोबरीत आहेत. मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे पार खेळला गेला. या सामन्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या दणादण विकेट्स काढत त्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. ऑस्ट्रेलियाने 49 षटकात 10 विकेट्स गमावत 269 धावा केल्या. मात्र, सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, जिथे दिसले की, कर्णधार रोहित शर्मा कुलदीप यादववर भडकला आहे. आता यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच, चाहते याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
या सामन्यात भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने शानदार गोलंदाजी केली. यावेळी त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 56 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. मात्र, कुलदीपकडून या सामन्यात असे काही घडले की, ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्यावर चांगलाच संतापला. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावातील 39व्या षटकादरम्यान घडली. हे षटक कुलदीप टाकत होता. या सामन्यात कुलदीपने आधी ऍलेक्स कॅरेला बाद केले होते. तेव्हाच शेवटचा चेंडू थेट ऍश्टन एगरच्या पॅडवर जाऊन लागला.
यानंतर कुलदीप आणि संघाच्या इतर खेळाडूंनी एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. मात्र, पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केले. मात्र, कुलदीप या विकेटसाठी एवढा उतावळा झाला होता की, रोहितकडे रिव्ह्यू घेण्याचा हट्ट करू लागला. रोहितने वारंवार नकार दिला, परंतु कुलदीपने हट्ट काही सोडला नाही. शेवटी रोहितने त्याचे ऐकले.
रोहितचा संताप
कुलदीपच्या सांगण्यावरून रोहितने रिव्ह्यू तर घेतला, पण इथे चांगलीच खळबळ माजली. कुलदीपला रिव्ह्यू घेतल्यानंतर जाणवले की, चेंडू स्टंप लाईनच्या बाहेर होता. त्याने याबाबत रोहितला सांगितले आणि त्यानंतर कर्णधार भलताच संतापला. रोहितने लाईव्ह सामन्यात कुलदीपला झापले. रिव्ह्यूमध्ये दिसले की, फलंदाज नाबाद होता.
INDvsAUS: #RohitSharma angry on #KuldeepYadav …#INDvsAUS pic.twitter.com/bkPPAuaPEA
— Harshit Srivastava (Dsena) (@HarshitDsena) March 22, 2023
Oh god! What a great character Rohit Sharma ❤️😭😂 .pic.twitter.com/KfSZZYtD90
— Vishal. (@SPORTYVISHAL) March 22, 2023
भारतीय संघाला विजयासाठी 270 धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलिया संघाने मिचेल मार्श (47) आणि ऍलेक्स कॅरे (38) यांच्या खेळीच्या जोरावर 269 धावा चोपल्या आणि भारतापुढे 270 धावांचे आव्हान उभारले. आता भारतीय संघ हे आव्हान पार करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ind vs aus skipper rohit sharma brutally angry on kuldeep yadav after his drs call in third odi 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक-कुलदीपच्या जलव्यानंतर ऑस्ट्रेलियाची झुंज! मालिका विजयासाठी टीम इंडियासमोर 270 धावांचे आव्हान
नॉर्मल वाटलो का! उभ्या आयुष्यात कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्धच घेतल्यात सर्वाधिक वनडे विकेट्स, आकडा वाचा