---Advertisement---

कशी नशिबाने थट्टा मांडली! आधी WTC Final गमावली, नंतर टीम इंडियाला बसला 115 टक्के दंडाचा फटका

IND-vs-AUS
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना भारतीय संघाने गमावलाच, पण याव्यतिरिक्त भारताला आणखी एक मोठा झटका बसला. आयसीसीने भारतीय संघावर षटकांची गती कायम न राखल्यामुळे संपूर्ण सामना शुल्काचा दंड ठोठावला. भारतासोबतच आयसीसीने डब्ल्यूटीसी विजेत्या ऑस्ट्रेलियावरही दंड ठोठावला. विशेष म्हणजे, शुबमन गिल यालादेखील दंडाचा सामना करावा लागला आहे. आयसीसीने ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

भारताला 115 टक्के दंड
डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात भारतीय संघाने षटकांची गती कायम न राखल्यामुळे संपूर्ण सामना शुल्काचा दंड ठोठावला. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियावरही सामना शुल्काच्या 80 टक्के दंड ठोठावला. भारतीय संघ निश्चित वेळेपेक्षा 5 षटके मागे होता. तसेच, ऑस्ट्रेलिया संघ निश्चित वेळेपेक्षा 4 षटके मागे होता. याव्यतिरिक्त भारतीय संघाच्या खेळाडूलाही दंडाचा सामना करावा लागला. आयसीसीने शुबमन गिल (Shubman Gill) याच्यावरही दंड ठोठावला. त्याच्यावर सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला. अशाप्रकारे भारतीय संघाला एकूण 115 टक्के दंड बसला.

शुबमनने मोडला नियम
भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान शुबमन गिल स्कॉट बोलँड (Scott Boland) याच्या चेंडूवर कॅमरून ग्रीन (Cameron Green) याच्या हातून झेलबाद झाला होता. यावेळी त्याने रिव्ह्यू घेतला, पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिले. या वादग्रस्त निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटल्या. स्वत: गिलही यामुळे खूपच निराश झाला होता. ही निराशा त्याने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दाखवली. त्यामुळे त्याच्यावर आयसीसीने सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावला.

भारताचा दारुण पराभव
भारतीय संघाला अंतिम सामन्यात वाईटरीत्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला दुसऱ्या डावात 234 धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाला 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या डावात शुबमन गिलचे बाद होणे वादग्रस्त ठरले. त्याच्या झेलावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

अंतिम सामन्यात गिल पहिल्या डावात फक्त 13 धावांवर बाद झाला होता, तर दुसऱ्या डावात गिलला फक्त 18 धावांवर तंबूचा रस्ता धरावा लागला. गिलव्यतिरिक्त रोहित शर्मा (15), विराट कोहली (14) आणि केएस भरत (5) यांनीही निराश केले. पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात मात्र, रोहित (43), विराट (49) आणि भरत (23) चांगले खेळले, पण त्यांचे योगदान संघाला विजयी करण्यासाठी पुरेसे नव्हते. (ind vs aus team india fined entirety of wtc 2023 final match fees for slow over rate shubman gill)

महत्वाच्या बातम्या-
स्मिथच्या ‘त्या’ कॅचने तोडले 140 कोटी भारतीयांचे हृदय, मान खाली घालून तंबूत परतला विराट- Video
“रोहितच्या नेतृत्वात आपण आयसीसी ट्रॉफी नाही जिंकू शकत”, माजी प्रशिक्षकाचे परखड मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---