भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला मागच्या मोठ्या काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी मिळत नव्हती. आता अखेर संघात त्याच्यासाठी जागा बनताना दिसत आहे. उमेशला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत संधी मिळणार आहे. तब्बल 43 महिन्यांच्या मोठ्या काळानंतर त्याला भारताच्या टी-20 संघासाठी खेळेल.
मोहम्मद शमी (Mohammad Shami) देखील मागच्या एक वर्षापासून भारताच्या टी-20 संघात जागा बनवण्यासाठी झगडतानाच दिसत आहे. त्याला 10 महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून टी-20 संघात पुनरगामन करण्याची संधी मिळाली. पण ही मालिका अगदी तोंडावर आली असतानाच शमीला कोरोनाची लागण झाली आणि त्याला माघार घ्यावी लागली. येत्या ऑक्टोबरमध्ये उमेश यादव (Umesh Yadav) वयाची 35 वर्ष पूर्ण करेल. त्याने मागच्या पाच महिन्यातंमध्ये ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, त्यामुळेच त्याला शमीच्या जागी संघात सामील केले गेल्याचे दिसते.
उमेश यादव मागच्या काही वर्षांपासून भारताच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यातही त्याला नियमित संधी दिली जात नाही. आयपीएल 2022 नंतर मात्र त्याने सर्वांचे लक्ष पुन्हा एखदा स्वतःकडे वेधले होते. कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटी रुपयांची बोली लावून उमेशला खरेदी केले होते आणि तो संघाच्या अपेक्षांवर खरा देखील उतरला. हंगामात खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये त्याने 16 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलनंतर उमेश मागच्या महिन्यात इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे.
रॉयल लंडन वनडे कपमध्ये त्याने मिडलसेक्स संघासाठी 7 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. तो मिडलसेक्स संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे, पण दुखापत झाल्यामुळे त्याला मायदेशात परतावे लागले होते. बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याने स्वतःचे रिहॅबिलिटेशन पूर्ण केले, पण इतक्यातच चार दिवसीय क्रिकेट खेळत्यावर त्याला पुन्हा दुखापत होण्याची दाट शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर एनसीएच्या मेडिकल टीमने त्याला इतक्यातच चार दिवसीय क्रिकेट न खेळण्याचे संकेत दिले. मिडलसेक्सने 16 सप्टेंबर रोजी उमेश यादव संघासाठी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती देखील दिली होती. अशात आता त्याला भारताच्या टी-20 संघात संधी मिळाल्यामुळे एनसीएचा सल्ला त्याच्यासाठी फायदेशीर ठरल्याचेच दिसते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
केविन ओब्रायनच्या शतकापुढे नर्सचे शतक फिके! गुजरातचा इंडिया कॅपिटल्सवर रोमांचक विजय
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज, सरावाला केली सुरुवात
भारतीय हॉकी क्षेत्रात भूकंप! कर्णधार मनप्रीतवर लावले गेले गंभीर आरोप; वाचा सविस्तर प्रकरण