बीसीसीआयने रविवारी (8 सप्टेंबर) बांग्लादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. बांग्लादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीसाठी निवड समितीने एक मजबूत संघ निवडला आहे. ज्यामध्ये एक-दोन खेळाडूंशिवाय आश्चर्यकारक नावे नाहीत. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे, तर रिषभ पंतचेही कसोटी संघात पुनरागमन झाले असून जसप्रीत बुमराहही खेळताना दिसणार आहे.
तसेच यावर्षी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान काही खेळाडूंना पदार्पणाची संधीही मिळाली. त्यापैकी सर्फराज खान आणि आकाश दीप आपली जागा कायम ठेवण्यात यशस्वी ठरले. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत आकाश दीपने घातक गोलंदाजी केली आणि त्याचा मोबदला देखील त्याला मिळाला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध सुरू झाला असून त्यामुळे यश दयालला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. टीम इंडियाचा संघ बऱ्यापैकी संतुलित दिसत आहे पण काही खेळाडू दुर्दैवी ठरले आहेत ज्यांना आपलं स्थान संघात राखण्यासाठी यश मिळाले नाही.
View this post on Instagram
3. देवदत्त पडिक्कल
डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलने यावर्षी धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. पडिक्कलला पदार्पणाच्या कसोटीत एकच डाव खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने अर्धशतकाच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. त्याचवेळी दुलीप ट्रॉफीमध्ये भारत क संघाविरुद्ध पहिल्या डावात खाते उघडण्यात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात 56 धावांची खेळी केली. असे असूनही पडिक्कलला चेन्नई कसोटीसाठी संघात स्थान मिळाले नाही.
2. मुकेश कुमार
टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेला मुकेश कुमार बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही स्थान मिळवू शकला नाही. त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही तरी त्याची संघात नक्कीच निवड होईल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. मुकेशने दुलीप ट्रॉफीच्या दोन्ही डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
1. मुशीर खान
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत सर्वाधिक चर्चा करणारा फलंदाज मुशीर खान होता. भारत ब संघाकडून खेळणाऱ्या या 19 वर्षीय खेळाडूने भारत अ संघाविरुद्ध 181 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. अशा परिस्थितीत खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या केएल राहुलच्या जागी मुशीरवर विश्वास ठेवला जाण्याची अपेक्षा होती, मात्र निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
हेही वाचा-
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासोबत दिसणार जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज, गंभीरशी खास नातं
IND VS BAN; श्रेयस अय्यरची सुट्टी; पंत-कोहलीचे पुनरागमन, पाहा संघाबाबत मोठे वैशिष्ट्ये
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने इतिहास रचला, मागील सर्व रेकॉर्ड मोडीत!