सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बुधवारी (09ऑक्टोबर) रात्री झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात बांग्लादेशचा 86 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताच्या विजयानंतर कर्णधार खूप आनंदी दिसला. त्याने नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांचे मनापासून कौतुक केले. पॉवरप्लेमध्ये 41 धावांवर तीन विकेट गमावल्याने टीम इंडिया अडचणीत आली होती. त्यानंतर या दोन युवांनी धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारली. नितीश आणि रिंकू यांच्यात चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. दोघांनी मिळून 108 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी भारतासाठी निर्णायक ठरली. नितीश रेड्डीने 34 चेंडूत 4 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. तर रिंकू सिंगने 29 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या.
भारताच्या बांग्लादेशवर 86 धावांनी विजय मिळविल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला अशी परिस्थिती हवी होती, मला माझ्या फलंदाजांनी (5,6,7 क्रमांकावरील) अशा परिस्थितीत यावे असे मला वाटत होते. मी त्या दोघांसाठी (रिंकू आणि नितीश) आनंदी आहे. मला पाहिजे तशी त्याने फलंदाजी केली.”
फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही भारताने कमाल दाखवली. सूर्यकुमार यादवने बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 गोलंदाजांचा वापर केला. ज्यात सर्वांना किमान 1 बळी मिळाला.
गोलंदाजीच्या अनेक पर्यायांबद्दल कर्णधार म्हणाला, “मला पाहायचे होते की भिन्न गोलंदाज वेगवेगळ्या परिस्थितीत काय करू शकतात. ते मला अवघड षटके देऊ शकतात का? हार्दिक, वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी केली नाही. मला इतर खेळाडूंकडे काय आहे ते पहायचे होते, मी त्यात खूश आहे. आजचा दिवस त्याचा (नितीश) होता.”
प्रथम फलंदाजी करताना भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी 222 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याला प्रत्युत्तर म्हणून पाहुण्या संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 135 धावा करता आल्या. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 12ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
हेही वाचा-
‘भारताने खरा हिरा गमावला…’, रतन टाटा यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा
भारताच्या ‘या’ दिग्गजाच्या नावावर असते 120 शतक पण…
INDW vs SLW; शानदार विजयासह भारताच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत