---Advertisement---

अजिबात ब्रेक नाही! कसोटी मालिकेसाठी हिटमॅनची जोरदार तयारी, VIDEO पाहा

---Advertisement---

टीम इंडियानं नुकतीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा तयारीला लागला आहे. मालिकेपूर्वी रोहितचा जोरदार ट्रेनिंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीम इंडियानं 19 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये 10 दिवसांचं अंतर आहे. मात्र भारतीय कर्णधारानं या अंतरात ब्रेक घेतला नाही आणि पुढच्या मालिकेची तयारी सुरू केली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हिटमॅन मैदानात धावताना दिसत आहे. न्यूझीलंड मालिकेपूर्वी त्याला कोणतीही कसर सोडायची नाही. यामुळे तो भरपूर घाम गाळतोय. न्यूझीलंडनं या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. किवी संघ शुक्रवारी (11 ऑक्टोबर) भारतासाठी रवाना होईल. या मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही.

 

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होईल. त्यानंतर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ – टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोढी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग

हेही वाचा – 

धोक्याची घंटा! जो रुट थांबायचं नाव घेईना, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड लवकरच मोडला जाणार?
एकेकाळी आपल्या गोलंदाजीनं केलं भल्या-भल्यांना गार, आता टीम इंडियामध्ये या दिग्गजाचं पुनरागमन अशक्य!
जो रूटचा बलाढ्य विक्रम, विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळपासही नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---