भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत खेळली जात आहे. भारताने तिसऱ्या दिवशी बांग्लादेशसमोर 515 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. भारताने दुसरा डाव 4 बाद 287 धावांवर घोषित केला. शुबमन गिल आणि रिषभ पंत यांनी शतके झळकावली. 176 चेंडूत 119 धावा केल्यानंतर गिल नाबाद राहिला.
कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना पंतने 128 चेंडूत 109 धावा केल्या. केएल राहुल 22 धावा करून नाबाद राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने रविचंद्रन अश्विनचे शतक आणि रवींद्र जडेजा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात 376 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ पहिल्या डावात 149 धावांवरच मर्यादित राहिला. पहिल्या डावानंतर भारताकडे 227 धावांची आघाडी होती. रोहित शर्मा आणि कंपनीने 515 धावाांचे तगडे लक्ष्य पाहुण्या संघासमोर ठेवले आहे.
INDIA DECLARED….!!!!
– Lead by 514 runs in the 2nd innings.
Hundreds by two future of Indian batting – Pant & Gill. 🔥 pic.twitter.com/EWd7CGigiV
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2024
पहिल्या डावात बांग्लादेश संघ काही विशेष करु शकला नाही. कर्णधार शांतोसह संघातील वरिष्ठ खेळाडू देखील भारतीय संघाच्या गोलंदांसमोर झगडाताना पाहायला मिळाले. पहिल्या डावात शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर संघाला एकूण 149 धावाच करता आल्या. तर टीम इंडियाकडून गोलंदाजीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी टिपल्या. त्याच्या व्यतिरिक्त रवींद्र जडेजा मोहम्मद सिराज आकाशदीप यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल दोघेही स्वस्तात बाद झाल्यानंतर शुबमन गिलसह रिषभ पंत यांनी टीम इंडियाला भक्कम परिस्थितीत पोहचवले. दोघांनी 167 धावांची शानदार भागिदरी केली. ज्यामध्ये रिषभ पंतने 109 धावांची दमदार खेळी खेळली. तर शुबमन गिल (119) आणि केएल राहुल (22) दोघेही नाबाद राहिले. गोलंदाजीत बांग्लादेशकडून सर्वाधिक मेंहदी हसन मिराजने 2 विकेट्स मिळवल्या. तर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या पाहुण्या संघाची सुरुवात चांगली झाली आहे. या बातमी आखेरीस संघ 7 षटकाराखेर 38-0 अश्या स्थितीत आहे.
हेही वाचा-
शाकिब अल हसनचं नाव इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू
पंत पाठोपाठ शुबमन गिलचंही शतक, टीकाकारांची बोलती बंद
रिषभ पंतचे शानदार शतक, कमबॅकच्या सामन्यात मोडला गुरु धोनीचा हा महान रेकाॅर्ड!