पुढील महिन्यात भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. तर या बातमीद्वारे बांग्लादेश मालिकेसाठी भारताचा 15 खेळाडूंचा संघ कसा असेल हे जाणून घेणार आहोत.
बीसीसीआयने अद्याप बांग्लादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. मात्र, कामाचा ताण लक्षात घेता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेत विश्रांती देण्यात येईल, असा दावा अनेक अहवालात केले आहे.
बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेमुळे स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केएल राहुल, सर्फराज खान आणि प्रसीद कृष्णा यांनाही या मालिकेत संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे तर मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार हे देखील 15 सदस्यीय संघाचा भाग असू शकतात.
इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणारा युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलला बांग्लादेशविरुद्धही संधी मिळू शकते. तो राखीव यष्टिरक्षक म्हणून 15 सदस्यीय संघाचा भाग असू शकतो.
या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित मानले जात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली. सर्फराजने या संधीचे सोने केले. अशा स्थितीत त्याला बांग्लादेश मालिकेत पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संभाव्य 15 सदस्यीय संघ – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, ध्रुव जुरेल (राखीव यष्टिरक्षक) आणि प्रसिद्ध कृष्णा
हेही वाचा-
‘या’ दिग्गज खेळाडूच्या जीवनावर येणार चित्रपट! म्हणाला, “माझ्या करोडो चाहत्यांना…”
‘बाबर-रिजवान’ नाही तर हा खेळाडू पाकिस्तानचा सुपरस्टार, वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा
‘सराव न करता बांग्लादेश मालिका…’, रोहित-विराटच्या विश्रांतीवर गावस्कर संतापले






