भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात बांग्लादेशचा 133 धावांनी पराभव केला आहे. भारताने पहिल्या डावात खेळताना 297 धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरात बांग्लादेशला 164 धावाच करता आल्या. यासह टीम इंडियाने बांग्लादेशचा तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात संजू सॅमसन भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने 47 चेंडूत 111 धावांची ऐतिहासिक खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक करत 75 धावा केल्या. तर गोलंदाजीत रवी बिश्नोईने 3 आणि मयंक यादवने 2 बळी घेतले.
सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा अवघ्या 4 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच वादळ आलं. त्यांच्यात 173 धावांची ऐतिहासिक भागीदारी झाली. सॅमसनने 111 धावा केल्या, तर दुसरीकडे सूर्यकुमारने 75 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रियान पराग यांनी स्फोटक शैलीत अनुक्रमे 47 आणि 34 धावा केल्या. बांग्लादेशकडून तनझिम हसन साकिबने सर्वाधिक 3 बळी घेतले.
विशाल 298 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांग्लादेश मैदानात उतरला तेव्हा मयंक यादवने डावाच्या पहिल्याच चेंडूवर परवेझ हुसैन इमॉनला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 59 धावसंख्येपर्यंत पाहुण्या संघाचे टॉप-3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा स्थितीत लिटन दास आणि तौहीद हृदय यांच्यात 53 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. लिटनने 25 चेंडूत 42 धावा केल्या, तर तौहीद 65 धावा करून नाबाद परतला. आपल्या टी-20 कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी आलेला महमुदुल्लाही केवळ 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎!
Congratulations to #TeamIndia on winning the #INDvBAN T20I series 3⃣-0⃣ 👏👏
Scorecard – https://t.co/ldfcwtHGSC@IDFCFIRSTBank pic.twitter.com/npNJ2jmryU
— BCCI (@BCCI) October 12, 2024
परिस्थिती अशी होती की बांग्लादेशने 3 षटकांपूर्वीच सामना गमावला होता. कारण त्यांना 18 चेंडूत 160 धावा हव्या होत्या. जे साध्य करणे अशक्य होते. बांग्लादेशला आक्रमक फलंदाजीची गरज असताना अखेरच्या 5 षटकांत संघाला केवळ 31 धावा करता आल्या. खराब फलंदाजीमुळे पाहुण्या संघाला 133 धावांच्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
रेकॉर्डच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हा सामना भारतासाठी संस्मरणीय ठरला. भारत आता टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा देश बनला आहे. टीम इंडियाने 297 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आता फक्त नेपाळ त्यांच्या पुढे आहे. ज्याने मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या.
तर संजू सॅमसन आता भारतासाठी टी20 सामन्यात दुसरे सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आत्तापर्यंत, टी20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा भारतीय विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. ज्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते.
हेही वाचा-
IND vs BAN; दसऱ्यादिवशीच संजू सॅमसन चमकला, ठोकले झंझावाती शतक!
वनडेमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू
PAK vs ENG; “क्लब संघ यापेक्षा चांगले क्रिकेट खेळतात” माजी खेळाडूने पाकिस्तानवर सोडले टीकास्त्र