---Advertisement---

“हा खेळाडू भविष्यात रविचंद्रन अश्विनसाठी योग्य पर्याय…”, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंदाज

On: रविवार, ऑगस्ट 25, 2024 9:49 AM
ravichandran Ashwin
---Advertisement---

पुढील महिन्यात भारताला बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. ज्यासाठी रोहित सेना मैदानात घाम गाळण्यात सुरुवात केली आहे. तर बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार टक्कर देत आहे. बांग्लादेश पाकिस्तानसह भारताला देखील चकित करत पाकिस्तान विरुद्ध पहिल्या डावात 117 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र, बांग्लादेश मालिकेविरुद्ध संघात कोण असेल याचा अंदाज चाहत्यांना आधीच लागलेला आहे. कोणत्या नवीन खेळाडूला संधी मिळेल आणि कोणाला डावलले जाईल हे पाहणे योग्य राहील. या दरम्यान आता माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अश्विनच्या जागी खेळणाऱ्या ऑफस्पिनरचे नाव उघड केले आहे.

एका वेबसाइटशी संवाद साधताना कार्तिकने 24 वर्षीय वॉशिंग्टन सुंदरची बाजू मांडताना सांगितले की, अश्विनच्या निवृत्तीनंतर या युवा खेळाडूमध्ये अनुभवी फिरकी गोलंदाजाची जागा घेण्याची क्षमता आहे. तो म्हणाला की, राष्ट्रीय निवड समिती ऑफस्पिनर्सच्या पुढच्या पिढीकडे नक्कीच पाहत आहे

पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, आता निवड समिती रविचंद्रन अश्विननंतर सुंदरला पहिला ऑफ-स्पिन म्हणून वापर करणार आहे. सुंदरने त्याला ज्या काही मर्यादित संधी मिळाल्या आहेत त्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे इतर ऑप-स्पिनरपेक्षा सुंदरला त्याचे हक्क लवकर मिळेल, असा माझा विश्वास आहे. मात्र, कार्तिकच्या वक्तव्यादरम्यान बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पहिली पसंती म्हणून संघात फक्त अश्विनचीच निवड केली जाईल. दोन्ही देशांमधला पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.

रविचंद्रन अश्विनच्या कसोटी करिअरबाबत बोलायचे झाल्यास तो भारतीय क्रिकेट इतिहासातील महान गोलंदांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 100 कसोटी सामने खेळला आहे. ज्यात त्याने 516 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बाॅलसह बॅटने देखील त्याने या फाॅरमॅटमध्ये शानदार कामागिरी केली आहे. त्याने 100 सामन्यांच्या 189 डावात 3309 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतके तर 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा-

श्रीलंकेला हरवून इंग्लंडने WTC गुणतालिकेत घेतली झेप, भारताचा नुकसान झाला का?
9 षटकारांसह 27 चेंडूत 70 धावा, गुजरातच्या स्टार खेळाडूचा सामन्यात कहर
सुट्टी संपली! बांग्लादेश मालिकेपूर्वी कर्णधाराने कंबर कसली; अभिषेक नायरसोबत…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---