भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळणाऱ्या इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच ५ सामन्यांच्या मालिकेतून आधीच बाहेर पडला होता. तसेच पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडने पहिला सामना जिंकला होता तर दुसरी कसोटी जिंकून भारताने बरोबरी साधली होती. तिसरा सामना भारताने जिंकला. जॅक लीच यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची बातमी सध्या समोर आली आहे.
याबरोबरच जॅक लीच एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे की, “मी उरलेली सूज कमी करण्यासाठी ऑपरेशन करणार आहे कारण ती कमी होत नाही. ते खूपच दुर्दैवी होते. “मैदानावरील पहिल्या डावातील हा दुसरा चेंडू होता, त्यामुळे मी संपूर्ण सामन्यात गुडघ्याच्या समस्येसह खेळत होतो.” भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जॅक लीचच्या रूपाने इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे संघाचा फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर होता.
याबाबत रविवारी 11 फेब्रुवारी रोजी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माहिती (ECB) शेअर केली आहे. याला इंग्लंड संघ व्यवस्थापनानेही दुजोरा दिला आहे. तसेच हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, दुखापत होऊनही त्याने गोलंदाजी केली आणि संघाने सामना जिंकला होता.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा फलकावर लावल्या आहेत.अनुभवी फलंदाज जो रूटने शतक ठोकत इंग्लिश संघाला ही धावसंख्या गाठण्यात मोलाचा वाटा उचलला. भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे आता इंग्लंडला दुसऱ्या डावात 46 धावांच्या आघाडी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : ध्रुव जुरेलचे झुंझार अर्धशतक, इंग्लंडकडे पहिल्या डावात 46 धावांची आघाडी
- WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेत रचला इतिहास, घ्या जाणून कोण आहे RCBची शोभना आशा