भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाला यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांच्यानंतर रजत पाटीदारच्या रूपाने पहिल्या सत्रात भारताला तीन मोठे धक्के बसले आहेत.
याबरोबरच राजकोटच्या या मैदानावर मार्क वुडचा पहिल्या सत्रात जलवा पहायला मिळाला आहे. तसेच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा 100 वा कसोटी सामना आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठी अपडेट दिली आहे. कारण भारतीय संघाचा एक खेळाडू या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे.
हा खेळाडू दुसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आहे, जो दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजच्या जागी खेळला होता. तसेच वर्कलोड मॅनेजमेंटमुळे मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता तो संघात परतला असून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. अशा परिस्थितीत मुकेश कुमारला बाहेर करण्यात आले आहे.
अशातच मुकेश कुमार आता रणजी ट्रॉफी 2024 मध्ये बंगाल संघाकडून खेळताना दिसणार आहे. तर बंगाल संघाचा पुढील सामना उद्यापासून म्हणजेच शुक्रवार 16 फेब्रुवारीला होणार आहे. अशा स्थितीत तो रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी पुन्हा संघाचा भाग होणार आहे.
UPDATE: Mr Mukesh Kumar has been released from the India squad for the third Test against England in Rajkot.
He will join his Ranji Trophy team, Bengal, for the team's next fixture before linking up with Team India in Ranchi.#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 15, 2024
दरम्यान, मुकेश कुमारने भारतासाठी आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 7 बळी घेतले आहेत. तसेच विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो इंग्लंडविरुद्ध खेळला होता. याबरोबरच, मुकेश कुमारने या सामन्याच्या दुसऱ्या डावात 5 षटके टाकली होती. त्यामध्ये त्याने 26 धावांत 1 बळी घेतला होता.
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024 : गुजरातने अचानक बदलला कर्णधार, ‘या’ खेळाडूकडे दिली धूरा
- Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत होणार विक्रमांचा विक्रम! अश्विन 500 तर अँडरसन 700 खेळाडूंची करणार शिकार