---Advertisement---

Ind vs Eng : भारतीय संघात होणार मोठे बदल; यष्टिरक्षकाचा पत्ता कट, त्रिशतक ठोकणाऱ्याची Playing 11 मध्ये एन्ट्री

Team India
---Advertisement---

Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोटमध्ये होणार आहे. 15 फेब्रुवारीपासून हा सामना सुरू होणार असून त्यासाठी सर्व खेळाडू तयारीत व्यस्त आहेत. याबरोबरच, भारतीय संघ जखमी झालेल्या खेळाडूंमुळे चिंतेत आहे. तसेच भारतीय संघात तिसऱ्या कसोटी सामन्यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

याबरोबरच, भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना जिंकल्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सरफराज खान आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांना पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. तर तिसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी भारतीय संघाच्या सराव सत्रामध्ये , सरफराजने स्लिप आणि गल्ली भागात क्षेत्ररक्षणाचा सराव केला तर जुरेलने यष्टिरक्षणाचा अधिक सराव केला आहे.

अशातच शुभमन गिलने गेल्या सामन्यातील दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. तर तिसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी शुभमन गिलने संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला नाही. तसेच विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गिलच्या उजव्या हाताला दुखापत झाली होता. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात त्याने क्षेत्ररक्षण केले नाही पण त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचेही सांगितले जात आहे.

याआधी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ मुंबईचा सर्फराज आणि उत्तर प्रदेशचा ध्रुव जुरेल यांच्यासोबत जाऊ शकतो. तसेच या दोघांनी सराव सत्रात क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षणात हात आजमावला असून त्यानंतर नेटमध्ये बराच वेळ फलंदाजी देखील केली आहे.

याबरोबरच, भारतीय संघात ध्रुव जुरेलला भरतपेक्षा अधिक पसंती मिळू शकते. कारण एक चांगला फलंदाज म्हणून त्याची सगळीकडे ओळख आहे. तसेच भरतला सलग सात कसोटी सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नाही. अशा परिस्थितीत मधल्या फळीतील चार खेळाडूंपैकी तीन खेळाडू एका कसोटीत उतरतील.

दरम्यान, भारतीय संघ हा बदलाच्या काळातून जाण्यासाठी सज्ज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यातून संघाच्या भविष्याची झलक पाहायला मिळेल. तसेच संघाच्या सराव सत्रादरम्यान पाटीदार आणि सर्फराज दोघेही स्लिप फिल्डिंगचा सराव करताना दिसले होते. तर खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड बराच वेळ गप्पा मारताना पहायला मिळाले होते.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---