IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. तर मालिकेतील तिसरी लढत ही राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणर आहे. तसेच पहिल्या दोन लढतीनंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याबरोबरच दोन्ही संघांसाठी हा कसोटी सामना अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
अशातच राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. याबरोबरच, राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाल्या आहेत. तसेच दोन्ही संघांना या कसोटी विजय मिळून मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे.
याबरोबरच, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल अशी खेळपट्टी दिली जाऊ शकते. ज्यावर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. तसेच भारतीय संघ व्यवस्थापन संथ वळणा-या खेळपट्टीवर खेळण्यास अधिक प्राधान्य देत असतो.
राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 14 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करणार आहे. तर या कार्यक्रमात राजकोटच्या स्टेडियमचे नामकरण अनुभवी प्रशासक निरंजन शहा यांच्या नावावर करण्यात येणार आहे.
तसेच ज्या राजकोट येथे ही लढत होणार आहे तेथे भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्या नावावर खास रेकॉर्ड आहे. हा रेकॉर्ड पाहून इंग्लंडच्या संघाचे टेन्शन नक्कीच वाढले. राजकोटच्या मैदानावर अश्विन अण्णाविरुद्ध खेळणे इंग्लंडसाठी महाअवघड गोष्ट ठरणार आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने या मैदानावर आतापर्यंत 2 कसोटी मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेली पहिली कसोटी ड्रॉ झाली होती. दुसरी कसोटी 2018 साली वेस्ट इंडिजविरुद्ध झाली होती. ज्यात भारताने 1 डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या –
- AUS vs WI : ऑस्ट्रेलियाच्या संघात तिसऱ्या T20I साठी ‘या’ स्फोटक फलंदाजाचा समावेश; घ्या जाणून कोण आहे तो…
- पुरुष प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा । अमर क्रीडा, सिद्धीप्रभा, ओम् पिंपळेश्वर, अंकुर स्पोर्टस् यांची विजयी सलामी.