AUS vs WI : आगामी टी-20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची T20I मालिका खेळला जात असून ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर आता या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी पर्थमध्ये होणार असून त्याआधी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात दोन नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे.
अशातच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा विस्फोटक फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज वेस अगर यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यासाठी संघात संधी देण्यात आली आहे. याबरोबरच, 21 वर्षीय जेक फ्रेझर-मॅकगुर्कने बीबीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यामुळेच त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
याबरोबरच, मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक खेळी खेळली. तो आगामी T20I सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे. तर तो डेव्हिड वॉर्नरसह टॉप ऑर्डरमध्ये डावाची सुरुवात करताना पहायला मिळू शकतो. तसेच, वेस एगरने 2021 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध एकदिवसीय फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली परंतु आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत.
अशातच या दोन नवीन खेळाडूंचा संघात समावेश करण्यासोबतच ऑस्ट्रेलियाने अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला देखील बाहेत ठेवले आहे. आता हेजलवूडने न्यूझीलंड दौऱ्यासाठी सिडनीला परतण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलियाला 21 फेब्रुवारीपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत.
घ्या जाणून वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिचेल मार्श (कर्णधार), वेस एगर, झेवियर बार्टलेट, जेसन बेहरेनडॉर्फ, ॲडम झाम्पा, टिम डेव्हिड, जेक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.
महत्वाच्या बातम्या –
- पुरुष प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा । अमर क्रीडा, सिद्धीप्रभा, ओम् पिंपळेश्वर, अंकुर स्पोर्टस् यांची विजयी सलामी.
- Jasprit Bumrah । महत्वाच्या सामन्यातून वेगवान गोलंदाज बाहेर? निर्णायक कसोटीसाठी करणार कमबॅक