भारतीय क्रिकेट संघ सध्या मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंड संघ ही कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सुरू होणार आहे. पण त्याआधीच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याविषयी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातीर राजकोट कसोटी झाल्यानंतर उभय संघांतील पुढचे दोन सामने रांची आणि धरमशाला याठिकाणी खेळले जातील. माध्यमांतील वृत्तांनुसार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात म्हणजेच रांची कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. या निर्णयामागे संघाची खास रणनीती देखील आहे. धर्मशालामध्ये खेळला जाणारा पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरू शकतो. अशात बुमराह त्यावेळी संघासोबत पाहिजे. याच कारणास्तव त्याला मालिकेतील चौथ्या कसोटीतून वगळण्यात येईल, अशा शक्यता आहेत.
याआधी माध्यमांमध्ये अशाही चर्चा होत्या की, उभय संघांतील तिसऱ्या कसोटी सामण्यातून जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाईल. पण सध्या तरी संघाकडून तसे कुठले संकेत मिळाले नाहीत. शनिवारी (10 फेब्रुवारी) बीसीसीआयकडून शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमसाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला. या संघात जसप्रीत बुमराह याचेही नाव होते. राजकोट कसोटीत बुमराह खेळेल, अशीच माहिती सध्या समोर येत आहे..
सुत्राच्या हवाल्याने माध्यमांमध्ये असे सांगितले गेले आहे की, “रांचीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाऊ शकते. यामुळे तो धर्मशालामध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी ताजातवाना असेल. शेवटचा कसोटी सामना मालिकेच्या निकालासाठी निर्णायक देखील ठरू शकतो. त्यामुळे तेव्हा बुमराह संघात उफस्थित असणे गरजेचे आहे.”
दरम्यान, उभय संघांतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह भारतासाठी मॅच विनर ठरला. बुमराहने या सामन्याच्या पहिल्या डावात 45 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात 46 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन देखील ठरले. या प्रदर्शनासाठी विशाखापट्टणम कसोटीत बुमराहला सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. (Jasprit Bumrah is expected to be rested for the Ranchi Test)
महत्वाच्या बातम्या –
‘सामना जाऊ दे, शिकून घे…’, अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलवेळी भारतीय खेळाडूंमध्ये चर्चा, पाहा VIDEO
सासऱ्यांविषयी प्रश्न विचारल्यावर रागाने लाल झाली रिवाबा! पाहा भाजप आमदार नक्की काय म्हणाल्या