भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. शुक्रवारी (2 जानेवारी) सुरू होणाऱ्या या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली होती. दुसरीकडे शुक्रवारी सकाळी भारतीय संघ घोषित झाल्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले.
विराट कोहली याच्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनीही दुसऱ्या कसोटीतून स्वतःचे नाव मागे घेतले. राहुल आणि जडेजाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत जाली होती. याच कारणास्तव दोन्ही खेळाडू विशाखापट्टणममध्ये खेळू शकले नाहीत. रणजीच्या मागच्या काही हंगामात चर्चेत राहिलेला सरफराज खान, आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा रजत पाटीदार कसोटी पदार्पणासाठी संघासोबत जोडले गेले. पण शुक्रवारी एकट्या रजतलाच टेस्ट कॅप दिली गेली. जतने याआधी भारतासाठी एक वनडे सामना खेळला आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचे आकडे देखील चांगले राहिले आहेत.
Congratulations to Rajat Patidar who is all set to make his Test Debut 👏👏
Go well 👌👌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/FNJPvFVROU
— BCCI (@BCCI) February 2, 2024
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे इंग्लंडसाठी शोएब बशील या युवा फिरकीपटूला कसोटी पदार्पणाची संधी दिली गेली आहे. दिग्गज जेम्स अँडरसन यानेही विशाखापट्टणम कसोटीतून पुनरागमन केले आहे.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
(Congratulations to Rajat Patidar who is all set to make his Test Debut )
महत्वाच्या बातम्या –
ओडिशा एफसी अव्वल स्थान डोळ्यासमोर ठेऊन केरला ब्लास्टर्स एफसीचा सामना करणार
प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा । ओम पिंपळेश्वर, अमर क्रीडा, विजय नवनाथ, लायन्स स्पोर्टस उपांत्यपूर्व फेरीत