भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना पाच गडी राखून जिंकला आहे. तसेच भारतीय संघासाठी गोलंदाजांनी जसप्रीत बुमराहाच्या गैरहजरीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर भारतीय संघाकडून ध्रुव जुरेलने दोन्ही डावात दमदार कामगिरी केली. त्याच्या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे भारतीय संघाने चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
अशातच भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. तसेच या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो. कारण जसप्रीत बुमराहला रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.
क्रिकबझच्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल. तसेच मंगळवारी भारतीय संघातील सर्व खेळाडू रांचीहून रवाना झाले आहेत. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना 2 मार्चपर्यंत चंदिगडमध्ये एकत्र येण्याच्या सूचना दिल्या आहेत. बुमराही चंदीगडमध्येच संघात सामील होणार आहे. यानंतर, संपूर्ण टीम चार्टर्ड फ्लाइटने 3 मार्च रोजी धरमशाला येथे जाणार आहेत.
याबरोबरच रांची कसोटीत बुमराहच्या जागी आकाशदीपने पदार्पण केले. आकाशदीपची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली होती. तर त्याने पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेत बुमराहची आतापर्यंतची कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 3 सामन्यात 13.65 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे धरमशाला येथील पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माही प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्याची दाट शक्यता आहे.
Jasprit Bumrah is likely to return to the squad for the final Test although discussions are still on regarding workload management of players[Cricbuzz]#JaspritBumrah pic.twitter.com/PzPLeDc5tA
— Satya Prakash (@Satya_Prakash08) February 28, 2024
दरम्यान, क्रिकबझच्या अहवालात असे म्हटले आहे की, रांची कसोटीत खेळलेल्या 11 खेळाडूंपैकी रोहित एका फलंदाज आणि एका गोलंदाजाला विश्रांती देऊ शकतो. यामध्ये रजत पाटीदार बाहेर जाऊ शकतो. याबरोबरच धरमशाला कसोटीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलच्या खेळावरही सस्पेंस आहे. हैदराबाद कसोटीपासून संघाबाहेर असलेला राहुल दुखापतीवर उपचारासाठी इंग्लंडला गेला आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील शेवटच्या कसोटीत खेळणे त्याच्यासाठी कठीण दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हार्दिक पांड्याने मोडला ‘हा’ नियम, अन् मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ
- IND vs ENG : चौथ्या कसोटीवेळी चाहत्यांना लागले विराट कोहलीच्या ‘अकाय’चे वेड, केली पदार्पणाची मागणी