---Advertisement---

ENGvIND: कर्णधार कोहलीने अश्विनऐवजी का केली जडेजाची निवड? फिरकीपटूने सांगितले कारण

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 1:17 PM
---Advertisement---

रविचंद्रन अश्विनला नॉटिंघममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. विराट कोहली चार वेगवान गोलंदाज आणि एकमेव फिरकीपटू रवींद्र जडेजासह मैदानावर उतरला आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा सक्रिय गोलंदाज अश्विन संघात असतानाही कोहलीने जडेजाची निवड का केली असावी? हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात घोंगावत आहे. माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हरझनला असे वाटते की, इंग्लंडच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचा वापर फारच कमी होईल. जडेजा विकेट-टू-विकेट गोलंदाजी आणि चमकदार फलंदाजीच्या आधारावर कोहलीची प्रथम निवड ठरला आहे.

अश्विनने नुकत्याच इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट सामन्यात सर्रेकडून खेळताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्याची अंतिम ११ जणांमध्ये निवड झाली नाही. कारण, भारताने चार वेगवान गोलंदाजांसह जाण्याचा निर्णय घेतला. हरभजन म्हणाला, “मला वाटते की, जर अश्विन खेळला असता तर आणखी एक खालच्या फळीतील फलंदाजाचा पर्याय भारताकडे असता.”

भारताने पहिल्या दिवशी इंग्लंडला फक्त १८३ धावांवर गुंडाळले. जडेजाला पहिल्या डावात फक्त तीन षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली.

यावर हरभजन सिंग म्हणाला, “कोणालाही माहिती नसते की, कसोटी सामन्यादरम्यान तुम्ही फिरकी गोलंदाजांना किती षटके देता. अशात फिरकी गोलंदाजीसाठी जेवढीही षटके वापरली जातील, त्यात जडेजा चांगली गोलंदाजी करू शकतो. मग जडेजाचा एकमेव फिरकीपटू म्हणून वापर होऊ शकत नाही या निष्कर्षावर आपण कसे येऊ शकतो? जर तुम्ही परदेशातील कामगिरी बघितली तर जडेजा एक चांगला फलंदाज आहे आणि खालच्या फळीत त्याची कामगिरी चांगली राहिली आहे.”

हरभजन म्हणाला, “जडेजाने विकेट्स घेतल्या नाहीत का? ही मालिकेची पहिली कसोटी आहे. तुम्हाला जिंकायचे आहे. मात्र, त्याचवेळी तुम्हाला तुमचा बचावही करायचा आहे. आपण फलंदाजीच्या पैलूचा फायदा गमावू इच्छित नाही आणि मला वाटते की संघ व्यवस्थापनाने असा विचार केला तर ते ठीक आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

बांगलादेशने पहिल्यांदाच टी२०त मात दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची भर मैदानात ‘अशी’ कृती

जबरदस्त! टप्पा घेतला, बॅटमधून मिस झाला अन् थेट पॅडला धडकला; शार्दुलच्या चेंडूवर रूटचे लोटांगण

खतरनाक यॉर्कर! अंडरसनला काही कळायच्या आतच झाली बत्ती गुल, बुमराहची रिऍक्शन होती बघण्यासारखी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---