सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामधील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशाळा होणार आहे. तसेच हा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तर रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडची धुरा आहे. भारतीय संघाने रांचीतील चौथ्या सामन्यासह मालिका जिंकली आहे. तसेच भारतीय संघ या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे.
याबरोबरच भारतीय संघाने या मालिकेवर आधीच कब्जा केला आहे, तर इंग्लंडचा संघ आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी धरमशाला येथे मैदानात उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ शेवटच्या कसोटी सामन्यासाठी धर्मशाला येथे पोहोचले आहेत. तसेच धर्मशाळा हे इंग्लंडचं दुसरं घर असणार आहे. कारण सध्या धर्मशाळेचं हवामान लंडनच्या हवामानाशी तंतोतंत जुळत आहे. अशातच इंग्लंडचा संघ रविवारी धर्मशाळा येथे पोहोचला तेव्हा पावसाने त्यांचे स्वागत केलं आहे.
इंग्लंडचा संघ सोमवारी धर्मशाळा येथ सराव करणार आहे. इंग्लिश संघाचे हे सत्र दुपारी दीड वाजता सुरू होईल. तर भारताचे सराव सत्र सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू होईल. तर धर्मशाला खेळपट्टीवर गवत असल्याने भारतातील इतर खेळपट्ट्यांपेक्षा वेगवान गोलंदाजांना येथे जास्त मदत मिळते. तर धर्मशालाच्या खेळपट्टीवरून वेगवान गोलंदाजांनाही स्विंग मिळतो. यामुळे इंग्लंडचे दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन यांना याचा फायदा होऊ शकतो.
VIDEO | Indian and England cricket teams arrive in Himachal Pradesh's Dharamshala.
The fifth test between the two teams will be played at the HPCA Stadium in Dharamshala from March 7.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/dc8D5uxOwC
— Press Trust of India (@PTI_News) March 3, 2024
दरम्यान, इंग्लंडशिवाय भारतीय संघ देखील धर्मशाळा येथे पोहोचला आहे. तसेच धर्मशाला येथे सोमवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून भारतीय संघ सराव करेल. याबरोबरच भारतीय संघाची नजर पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवत इंग्लंड संघाचा 4-1 असा पराभव करेल. यामुळे भारतीय संघ 2023-25 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी आपले स्थान मजबूत करू शकतो. तसेच भारतीय संघ सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Ranji Trophy 2024 : परिस्थिती गंभीर, शार्दूल खंबीर, तामिळनाडू विरुद्ध शार्दूल ठाकुरचं दमदार शतक
- IPL 2024 : मोठी बातमी! गुजरात टायटन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूचा अपघात, बाइक पडली महागात