भारत आणि इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. तसेच भारतीय संघासाठी मोठा धक्का म्हणजे स्टार बॉलर जसप्रीत बुमराह याल विश्रांती देण्यात आली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या 23 फेब्रुवारीला होणार आहे. याबरोबरच,जसप्रीत बुमराह या मालिकेत अप्रतिम गोलंदाजी करत असून या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तरीही बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.
याबरोबरच, बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती का देण्यात आली आहे. त्याची माहिती चाहत्यांना अजूनही समजू शकलेली नाही. खरे तर संघाने रांची कसोटी सामना जिंकला तर मालिकाही जिंकेल. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी हा सामना खूप खास मानला जात आहे. पण आता भारतीय संघाला रांची कसोटी सामन्यात बुमराहशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.
https://twitter.com/ICC/status/1760122433393020975
अशातच मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह बर्याच काळापासून सतत क्रिकेट खेळत आहे. अशा परिस्थितीत बुमराहला कामाच्या प्रचंड ताणामुळे विश्रांती देण्यात आली आहे. तर बुमराहला मालिकेतील सर्व सामने खेळायचे होते. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, बुमराह मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळताना पहायला मिळणार आहे. याबरोबरच बुमराहने आतापर्यंत तीन सामन्यांच्या 6 डावात 17 विकेट्स घेतले आहेत. तर चौथ्या कसोटी सामन्यात बुमराह न खेळल्याने इंग्लंडला थोडा दिलासा मिळणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1759980290225688713
दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला होता. त्यामध्ये पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला होता. त्यानंतर इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यानंतर सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला चौथा सामना जिंकून मालिका खिशात घालायचा प्रयत्न असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –