---Advertisement---

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी १४ जणांच्या इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

On: रविवार, मार्च 21, 2021 5:17 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकतीच ५ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. ही मालिका भारताने ३-२ अशा फरकाने जिंकली. आाता या दोन संघात २३ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा १४ जणांचा संघ जाहिर करण्यात आला आहे. याबरोबरच ३ राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मुकणार आहे. त्याच्या हाताच्या कोपराला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएलमधील पहिल्या काही सामन्यांनाही मुकणार आहे. तो आता भारतातून परत इंग्लंडला परतेल. याशिवाय जो रुटला देखील विश्रांती देण्यात आली आहे.

इंग्लंडचे कर्णधारपद ओएन मॉर्गनकडेच असेल. तसेच या संघात मोईन अली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जोस बटलर, मार्क वूड, जेसन रॉय, आदिल राशिद या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

त्याचबरोबर राखीव खेळाडूंमध्ये जॅक बॉल, ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड मलान या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

या वनडे मालिकेतील तीन सामने अनुक्रमे २३, २६ आणि २८ मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुंजे येथे होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होतील.

वनडे मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ 

ओएन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, मार्क वुड.

राखीव खेळाडू – जॅक बॉल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान

महत्त्वाच्या बातम्या –

सचिनने मारली लाराला स्कुटीवरून रपेट, दिला ‘हा’ खास संदेश, पाहा व्हिडिओ

पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे..! रोहितने ‘या’ गेम चेंजर खेळाडूवर उधळली स्तुतिसुमने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---