---Advertisement---

ओव्हल कसोटी: दुसऱ्या दिवशीही पावसामुळे खेळ बिघडणार का? जाणून घ्या हवामान अंदाज!!

On: शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025 7:43 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे फक्त 64 षटके टाकता आली. नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. संघाने पहिल्या डावात दिवसाच्या खेळाच्या शेवटी 6 गडी गमावून 204 धावा केल्या, ज्यामध्ये करुण नायर 52 तर वॉशिंग्टन सुंदर 19 धावा करुन क्रीझवर आहेत. आता सर्व चाहत्यांच्या नजरा दुसऱ्या दिवसाच्या खेळावर आहेत, ज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लंडनमध्ये खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, AccuWeather च्या अहवालानुसार, स्थानिक वेळेनुसार जेव्हा सामना सकाळी 11 वाजता सुरू होईल, तेव्हा त्या वेळी पावसाची शक्यता फक्त 5 टक्के आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत पावसाची शक्यता खूप आहे. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत 50 टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे दुसऱ्या सत्रात खेळात व्यत्यय येऊ शकतो. नंतर शेवटच्या सत्रात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे व्यक्त करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसाच्या तापमानाबद्दल बोलायचे झाले तर ते कमाल 22 अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकते.

इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल कसोटी सामन्यात करुण नायरने अखेर आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. एकीकडे टीम इंडियाचे टॉप ऑर्डर फलंदाज हिरव्या टॉप विकेटवर संघर्ष करताना दिसत होते, तर नायरने पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच आपले अर्धशतक पूर्ण केले. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळात त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. आतापर्यंत, नायर आणि सुंदर यांच्यात 7व्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली आहे, ज्यामध्ये जर ते आणखी वाढ करु शकले तर या सामन्यात भारतीय संघाची स्थिती खूपच चांगली होऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---