दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर भारताचा टी२० संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तर कसोटी संघ मात्र इंग्लंड दौऱ्यावर असेल. इंग्लंडविरुद्ध भारताला १ जुलैपासून एकमात्र कसोटी सामना खेळायचा आहे. या कसोटी सामन्यासाठी भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते केएल राहुल जर या सामन्यात खेळला नाही, तर भारतीय संघासाठी ही खूप चिंतेची बाब असेल.
केएल राहुल (KL Rahul) सध्या ग्रोईन इंजरीशी झगडत आहे. याच कारणास्तव तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत खेळू शकला नाही. रोहित शर्मासह इतर काही वरिष्ठ खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत विश्रांती दिली गेली होती. अशात राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवले गेले होते, पण मालिका सुरू होण्याच्या आधीच त्याला माघार घ्यावी लागली आणि रिषभ पंतने संघाने नेतृत्व केले. आता असे सांगितेल जात आहे की, शक्यतो राहुल भारतीय संघासोबत (Team India) इंग्लंड दौऱ्यावर देखील जाऊ शकणार नाही.
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा (Aakash Chopra) त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. त्यावेळी त्याने केएल राहुलच्या दुखापतीविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “सध्यातरी केएल राहुलचे इंग्लंड दौऱ्यावर जाणे संभ्रमात आहे. मागच्या वेळी त्याने खूप चांगले प्रदर्शन केले यात शंका नाही. रोहित आणि राहुलची सलामीवीर जोडीने भारतासाठी कमाल प्रदर्शन केले. पण आता मला अनेक अडचणी दिसत आहेत. सर्वात आधी विराट कोहली आणि रोहित शर्मा पूर्णपणे तयार वाटत नाहीत.”
रोहित आणि विराटने नुकत्याच खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२ मध्ये अपेक्षित प्रदर्शन केले नव्हते. याच पार्श्वभूमीवर आकाश पुढे बोलताना म्हणाला की, “दोघांसाठी (रोहित-विराट) आयपीएल हंगाम ठीक राहिला नाही. त्यांनी मध्ये एक मालिका देखील खेळली नाहीये. दौऱ्यातील पहिलाच सामना एक कसोटी सामना आहे. अनेकदा तुम्हाला चौथ्या कसोटी सामन्यापर्यंत ताळमेळ येत नाही आणि इथे तर तुम्हाला फक्त एकच कसोटी सामना खेळायचा आहे. तर ही एक अडचण पहिल्यापासूनच आहे आणि जर केएल राहुल खेळला नाही, तर तुमच्यापुढे अजून एक मोठी समस्या असेल.”
दरम्यान, मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेवटचा कसोटी सामना रद्द केला होता. कसोटी मालिकेतील पहिल्या चार सामन्यामध्ये भारतीय संघाने २-१ अशी विजयी आघाडी घेतली होती. केएल राहुलने या चार सामन्यांमध्ये ३९.३७ च्या सरासरीने ३१५ धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे रोहित शर्मानेही ३६८ धावांचे योगदान दिले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयसीसच्या टोपीसोबतचा फोटो शेअर करत बाबारने लिहिलं भन्नाट कॅप्शन, एकदा पाहाच
‘आता दबाव आफ्रिकी संघावर’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने दिले भारतीय संघाला बळ
‘कष्टाचं फळ मिळालं!’ संघात निवड झाल्यानंतर राहुल त्रिपाठीची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला