भारत आणि हॉंगकॉंग यांच्यातील सामना बुधवारी (31 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळला गेला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीच केली. कर्णधार रोहित आणि त्याच्या जोडीने सलामीसाठी आलेला केएल राहुल मोठी खेळी करू शकले नाहीत. परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली फॉर्ममध्ये दिसला. त्याने 40 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. विराटचे शेवटचे अर्धशतक तब्बल 194 दिवसांपूर्वी 18 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीज संघाविरुद्ध आले होते.
𝐅𝐈𝐅𝐓𝐘 for @imVkohli 💪💪
A well made half-century for Virat Kohli. His 31st in T20Is.
Live – https://t.co/k9H9a0e758 #INDvHK #AsiaCup2022 pic.twitter.com/QeZsANLiFq
— BCCI (@BCCI) August 31, 2022
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यात मोठी भागिदारी झाली. सलामीवीर केएल राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार मैदानात आला आणि विराटसोबत मिळून मोठी खेळी केली. विराट कोहली आशिया चषकाच्या चालू हंगामात अर्धशतक करणार पहिला फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार आणि विराट यांनी मिळून अवघ्या 26 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. विराटच्या अर्धशतकानंतर सूर्यकुमाने देखील अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक केले. त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 22 चेंडूत 50 धावा साकार केल्या. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारतीय संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकांमध्ये 192 धावा साकारल्या. या धावा करण्यासाठी विराट आणि सूर्यकुमार यादव यांनी सर्वात मोठे योगदान दिले. विराटने या सामन्यात एकूण 44 चेंडू खेळले, ज्यामध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 59 धावा केल्या. सूर्यकुमारने 26 चेंडूत ताबडतोड 68 धावा केल्या आणि संघाला मोठी धावसंख्या करून दिला. यामध्ये त्याच्या 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सेहवाग, सचिन आणि गावसकरांनंतर फक्त रोहितच! 21 धावांच्या खेळीत रचला मोठा विक्रम
ना सचिन, ना जयसुर्या, ना धोनी! असा पराक्रम करणारा रोहित जगातील पहिलाच खेळाडू
“आता राशिद सर्वांना पार्टी देईल”; माजी कर्णधार अफगाणिस्तानच्या विजयाने आनंदला