भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली बुधवारी (31 ऑगस्ट) चमकदार खेळी करू शकला. हॉंगकॉंगविरुद्ध खेळताना केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर त्याने चाहत्यांची मने जिंकल्याचे दिसते. विराट आणि सूर्यकुमारच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 40 धावांनी जिंकला. सामन्यात पराभवाचा तेंड पाहावे लागले असले, तरी हॉंगकॉंग संघाने खेळाडू वृत्तीचे एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.
सामना संपल्यानंतर हाँगकाँग संघाने विराट कोहली (Virat Kohli) याला त्यांच्या संघाची जर्सी भेट केली. विराट मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. आशिया चषकात विराट त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये पुनरागमन करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पाकिस्ताननंतर आता हाँगकाँगविरुद्ध खेळताना त्याला जुना फॉर्म काही प्रमाणात का होईना पुन्हा येताना दिसत आहे. बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत ६ चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या असल्या, तरी विराटने प्रदर्शन देखील तितकेच महत्वाचे होते. खेळपट्टीवर सूर्यकुमारला चांगली साथ देत विराटने 44 चेंडूत 59 धावा केल्या.
चाहत्यांना मोठ्या काळानंतर विराटने अर्धशतक पाहायला मिळाल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. विरोधी हॉंगकॉंग संघ देखील विराटचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. हाँगकाँगने विराटला त्यांच्या संघाची जर्सी भेट केली, ज्यावर एक खास संदेश लिहिला होता. जर्सीवर लिहिले होते की, “एका पिढील प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद. आम्ही तुझ्या सोबत आहोत. पुढे पूर्ण ताकदीनिशी आणि प्रेमाचे अनेक चांगले दिवस येणार आहेत. हाँगकाँग संघ.” विराटने त्याला मिळालेल्या या जर्सीची माहिती इंस्टाग्राम स्टोरिच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली. विराटने लिहिले की, “धन्यवाद हाँगकाँग क्रिकेट. ही वागणूक खरोखर खूप नम्र आणि प्रेमळ आहे.”
दरम्यान, भारतीय संघाने आशिया चषकातील पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 विकेट्सच्या अंतराने पराभूत केले होते. आता हाँगकाँगला परभूत केल्यानंतर भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. भारत पहिला संघ ठरला आहे, ज्याने आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये जागा पक्की केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हाँगकाँग विरुद्ध तळपला सूर्या! कॅप्टन रोहितला मागे टाकत केली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
सूर्यकुमारच्या ‘360 डिग्री’ फलंदाजीच्या प्रेमात पडला कोहली, स्टेडियममध्ये खाली झुकून केला मुजरा