---Advertisement---

IREvsIND: ‘पंड्या एँड कंपनी’ मालिका जिंकणार की पाऊस करेल खेळ खराब? वाचा सविस्तर

On: मंगळवार, जून 28, 2022 11:19 AM
---Advertisement---

आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पहिला टी२० सामना जिंकताच मालिकेची विजयी सुरूवात केली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करत आहे. आयर्लंड विरुद्ध भारत (IREvsIND) दुसरा टी२० सामना मंगळवारी (२८ जून) खेेळला जाणार आहे. हा सामना द विलेज, मालाहिदे, डबलिन येथे खेळला जाणार आहे. पहिला सामनाही येथेच खेळला गेला होता. त्यावेळेस सामन्याच्या सुरवातीलाच पाऊस पडल्याने सामना १२-१२ षटकांचा खेळला गेला. दुसरा सामना जिंकत मालिका २-० अशी करण्याच्या हेतूने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळीही पाऊस खेळामध्ये वत्यय आणण्याची शक्यता आहे.

आयर्लंडच्या हवामान खात्याने पहिल्या सामन्यात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज सांगितला होता. झालेही तसेच, पाऊस पडल्याने सामन्याचा काही वेळ वाया गेला. त्यांनी दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. यामुळे जर पाऊस झाला तर पुन्हा एकदा कमी षटकांचा खेळ होईल. पाऊस जोरात असेल तर सामना रद्दही होऊ शकतो. असे झाले तर, भारताचे आयर्लंड विरुद्ध आयर्लंडमध्ये सलग दुसऱ्यांदा मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८मध्ये भारताने मालिकेत खेळलेले दोन्ही टी२० सामने भारताने जिंकले होते.

पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असल्याने तो या सामन्यात खेळणार की नाही हे स्पष्ट नाही. त्याने पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण केले होते. मात्र तो फलंदाजीला आला नाही. त्याच्याऐवजी इशान किशन (Ishan Kishan) सोबत दीपक हुड्डा सलामीला आला. त्याने तुफानी खेळी करत नाबाद ४७ धावा केल्या होत्या. यामुळे दुसऱ्या सामन्यात तोच सलामीला येऊ शकतो.

या सामन्यातून उमरान मलिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याला एकच षटक टाकण्याची संधी मिळाली. त्यामध्येही त्याने १४ धावा दिल्याने तो महाग ठरला. उपकर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल यांनी आयर्लंडच्या फलंदाजांना धावा करण्यापासून चांगलेच रोखून धरले होते, मात्र आवेश खान शेवटच्या काही षटकांमध्ये संघाला भारी पडला. यामुळे त्याला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

आयर्लंडच्या हॅरी टॅक्टरने पहिल्या सामन्यात धडाकेबाद फलंदाजी केली होती. पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाल्याने त्याने तुफानी खेळी केली आहे. त्याने ३३ चेंडूत ६४ धावा केल्या होत्या. या सामन्यात एकटा खेळाडू भारतावर भारी पडला होता. यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजंना त्याला लवकर बाद करावे लागेल

जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत उत्तम कामगिरी केली असता त्या खेळाडूंची इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी संधी आहे.

भारताचा संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

आयर्लंडचा संघ:
अँड्रयू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी (यष्टीरक्षक), जोश लिटिल, एंड्रयू मॅकब्रायन, बैरी मॅककार्थी, कॉनर ओल्फर्ट, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, क्रेग यंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ठरलयं! इ्ंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये ‘हाच’ खेळाडू करणार भारताचे नेतृत्व, स्वत: दिले संकेत

‘म्हणून गांगुलीप्रमाणेच ९९ नंबरची जर्सी घातली’, स्वत: खेळाडूनेच दिले स्पष्टीकरण

मोठी बातमी! भारत विरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा अंतिम संघ ठरला, बघा नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---