भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर असून यामध्ये टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत दोन टी२० सामने खेळले जाणार असून ते दोन्ही सामने डबलिन येथे खेळले जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करणार आहे. आयर्लंडचा खेळाडू हॅरी टेक्टर याचाही संघात समावेश आहे. त्याच्याबरोबर त्याची पत्नीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.
हॅरीची पत्नीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आयर्लंड संघाचे प्रतिनिधित्व करते. गॅबी लेविस असे तिचे नाव असून तिने २०१४मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तिने हॅरीपेक्षा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. या अष्टपैलू खेळाडूने वनडे आणि टी२० मिळून ७६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हॅरीने २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून त्याने २० वनडे आणि ३२ टी२० सामने खेळले आहेत.
https://www.instagram.com/p/CXIySPDsmZm/?utm_source=ig_web_copy_link
भारत आणि आयर्लंडमध्ये आतापर्यत तीन टी२० सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यात भारताने बाजी मारली आहे. यावरून भारत भक्कम स्थितीत वाटत असला तरी सामन्यात काहीही होऊ शकते. आधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघ मजबूत स्थितीत होता आताच्या संघात सर्वाधिक युवा खेळाडू आहेत. त्यातील अनेकांनी आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) उत्तम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतीय संघ नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळला आहे. यातील बहुतेक खेळाडू या मालिकेत खेळणार आहेत. यावरून ते खेळाडू या मालिकेत कशी कामगिरी करणार याकडे लक्ष असेल.
भारत या मालिकेतील पहिला टी२० सामना २६ जूनला डबलिन येथे खेळणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. या मालिकेतील टी२० सामन्यांचे भारतामध्ये सोनी नेटवर्कवर प्रसारण होणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे-
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रजत पाटीदारने वाढवले मुंबईचे टेंशन, धडाकेबाज शतक ठोकत संघाला आणले मजबूत स्थितीत
SL vs AUS: ऑस्ट्रेलियाची विजयी अखेर, मात्र मालिका नावावर करत श्रीलंकेने रचला इतिहास