शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना जिंकला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. गिल आणि सिराजप्रमाणेच न्यूझीलंडसाठी मायकल ब्रेसवेल याने एकाकी झुंज दिली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सामना गमावल्यानंतर ब्रेसवेलची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित आणि शुबमन गिल (Shubman Gill) भारताचा डाव सुरू करण्यासाठी मैदानात आले. 38 चेंडूत 34 धावा करून रोहित शर्मा बाद झाला, पण गिल मात्र खेळपट्टीवर बराच वेळ खेळत राहिला. गिलने 149 चेंडूंचा सामना करत 208 धावांची वादळी खेळी साकारली. यात 19 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. या अप्रतिम प्रदर्शनासाठी गिलला सामनावीर पुरस्कार दिला गेला. गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्यासह कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकुर यांनीही उत्कृष्ट प्रदर्शन केले. सिराजने चार विकेट्स घेतल्या, तर कुलदीप आणि शार्दुलने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या.
उभय संघांतील हा सामना रोमांचक झाला कारण मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell) शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर होता आणि न्यूझीलंडच्या आशा कायम होत्या. पण शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शार्दुलने त्याची विकेट घेत सामना नावावर केला. स्वतःच्या संघासाठी 140 धावांची महत्वपूर्ण खेळी केल्यानंतर ब्रेसवेल म्हणाला, “आम्ही एक चांगली भागीदारी करण्यात यशस्वी झालो, पण दुर्दैवाने ही गोष्ट विजयासाठी पुरेशी नव्हती. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची ही सुरुवात आहे आणि माझ्याकडे या गोलंदाजांविरुद्ध खेळण्याचा अनुभवही जास्त नाहीये. पण ते कशी गोलंदाजी करतात, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे.”
न्यूझीलंड संघासाठी मिचेल सॅटनर आणि ब्रेसवेल यांच्यात 162 धावांची भागीदारी झाली. याविषयी ब्रेसवेल म्हणाला, “सॅटनर आणि मी एकादा खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर विजयाची जास्त चर्चा करत नव्हतो. आम्हाला सामना शेवटपर्यंत न्यायचा होता.” ब्रेसबेलने बुधवारी (18 जानेवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात अवघ्या 78 चेंडूत 12 चौकार आणि 10 षटकार ठोकत 140 धावा कुटल्या. ब्रेसवेल आथा संघासाठी 7 किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर खेळताना सर्वात मोठी खेळी करणाऱ्यांच्या यादीत संक्युक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. (Michael Bracewell’s special reaction after the loss)
वनडे क्रिकेटमध्ये 7 किंवा त्याखालच्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
170* ल्यूक रोंची विरुद्ध श्रीलंका, डुनेडिन 2015
146* मार्कस स्टोइनिस विरुद्ध न्यूजीलैंड, ऑकलँड 2017
140 थिसारा परेरा विरुद्ध न्यूजीलैंड, माउंट माउंगानुई 2019
140 माइकल ब्रेसवेल विरुद्ध भारत, हैदराबाद 2023
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…तेव्हा वाटले मी द्विशतक करू शकतो’, सामनावीर शुबमन गिलची खास प्रतिक्रिया
ऐतिहासिक ‘गॅबा’ विजयाला दोन वर्ष पूर्ण! जेव्हा भारताच्या जखमी वाघांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात केले परास्त