भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात शुबमन गिल याने तुफान फटकेबाजी केली. शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने 4 बाद 234 धावा कुटल्या. सूर्यकुमार यादव याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र 24 धावा करून त्याने विकेट गमावली. फलंदाजीत मोठे योगदान देऊ शकला नाही, तरी सूर्याने क्षेत्ररक्षण करताना मात्र स्वतःची भूमिका चोख बजावली. त्याचा यष्टीरक्षकाच्या बाजूवा म्हणजेच स्लीप्समध्ये उभे राहून दोन उत्कृष्ट झेल पकडले.
भारतीय संघ गोलंदाजीला आला तेव्हा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पहिल्या षटकापासून स्लीप्समध्ये श्रेत्ररक्षणासाठी उभा होता. कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. पहिल्या षटकात स्वतः कर्णधार गोलंदाजीला आणि षटकातील पाचव्या चेंडूवर सलामीवीर फिन एलन (Finn Allen) याला सूर्यकुमारच्या हातात झेलबाद केले. यष्टीरक्षकाच्या शेजारी उभा असलेला सूर्यकुमार झेल घेण्यासाठी आधीच तयारीत होता. चेंडू फिन एलनच्या बॅटला लागून मागच्या दिशेने गेल्याबरोबरी सूर्याने हवेत उडी मारत झेल पकडला. भारतीय संघाला मिळालेली ही पहिली विकेट होती. चाहते सूर्याची चपळाई पाहून खुश झाले पण सूर्यकुमार मात्र एवढ्यावर थांबला नाही.
Suryakumar Yadav has taken 2 similar catches at slips – excellent catch. pic.twitter.com/8EWY0uIxKd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 1, 2023
डावातील तिसऱ्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी पुन्हा आला आणि सूर्यकुमारने देखील त्याच जागेवर पुन्हा एक अप्रतिन झेल टिपला. यावेळी न्यूझीलंडचा मध्यक्रमातील फलंदाज ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) हार्दिक आणि सूर्याच्या जाळ्यात अडकला. न्यूझीलंड संघाने गमावलेली ही चौथी विकेट होती. न्यूझीलंड संघाने त्याच्या पहिल्या चार विकेट्स अवघ्या 7 धावांवर गमावल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या 21 झाल्यानंतर न्यूझीलंडने पाचवी विकेट देखील गमावली. शेवटची अवघ्या 66 धावांवर न्यूझीलंडचे सर्व खेळाडू बाद झाले आणि भारताने सामन्यास मालिका नावावर केली.
तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलाल्या भारतीय संघाचा सलामीवीर ईशान किशन स्वस्तात बाद झाला, पण संघाचा दुसरा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने नाबाद 126 धावा कुटल्या. गिलने या धावा करण्यासाठी 12 चौकार आणि 7 षटकार मारले आणि एकूण 63 चेंडू खेळले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या भारतीय संघाचे सचिन तेंडुलकरडून कौतुक, बीसीसीआयकडून मिळाला विशेष सन्मान
अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्राला मिळाले भरभरून! इतिहासात प्रथमच 3000 पेक्षा जास्त कोटींची तरतूद