भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक शुक्रवारी (25 नव्हेबंर) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला. भारतीय संघासाठी त्याने खेळलेला हा पहिलाच एकदिवसीय सामना होता, ज्यामध्ये त्याने सर्वांचे लक्ष देखील वेधले. शिखर धवनच्या नेतृत्वात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या उमरानने या सामन्यातील पहिल्याच षटकात जवळपास 150 किमीच्या ताशी गतीन गोलंदाजी केल्याचे चाहत्यांना पाहायला मिळाले. अशात या भेदक गोलंदाजीसाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारता ने 1-0 असा विजय मिळवला आहे. 25 नोव्हेंबर रोजी उभय संघांतील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना ऑकलॅन्डमध्ये खेळला गेला, जो न्यूझीलंडने 7 विकेट्स राखून जिंकला. उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या दोघांसाठी हा त्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पदार्पणाचा सामना होता. कारकिर्दीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील 11 व्या षटकात उमरानला गोलंदाजीची संधी मिळाली. याच षटकात त्याने विरोधी संघाच्या फलंदाजांना घाम फोडल्याचे दिसले. त्याने या षटकात संघासाठी किफायतशीर आणि वेगवान गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्या षटकातील पहिला चेंडू उमरान मलिकने 145.9 किमी ताशी गतीने टाकला. षटकातील दुसरा चेंडू उमरानने 143.3 च्या ताशी गतीने टाकला. तिसरा चेंडू त्याने 145.6 किमी, चौथा चेंडू 147.3 किमी, तर पाचवा चेंडू थोडा संथ गतीने म्हणजेच 137.1 किमीच्या ताशी गतीने टाकला. षकातील शेवटचा चेंडू मात्र त्याने जास्त ताकतीने फेकल्याचे पाहायला मिळाले. हा चेंडू उमरानने 149.6 किमीच्या ताशी गतीने टाकला. या षटकात त्याने एकूण चार धावा दिल्या. या षटकातील त्याचे प्रदर्शन पाहून सोशल मीडियावर चाहते व्यक्त होत आहेत.
https://twitter.com/SunRisers/status/1596030133608947713?s=20&t=WyNrLNgNgksVux0t4qcaLQ
न्यूझीलंड संघाचा सलामीवीर डेवॉन कॉनवे याला उमरानने बाद केले आणि कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यान यष्टीपाठी उमरानचा झेल पकडला. एकदिवसीय कारकिर्दीतील उरमची दुसरी षटकार ठरला डॅरिल मिचेल, ज्याने 20 व्या षटकात दीपक हुड्डाच्या हातात झेल देत विकेट गमावली. उमरानने यापूर्वी भारतासाठी तीन टी-20 सामने खेळले असून यात काही खास कामगिरी करू शकला नाहीये. पण त्याचे पदार्पण मात्र चांगले झाले आहे. त्याने या सामन्यात टाकलेल्या 10 षटकांमध्ये 66 धावा खर्च करून भारतासाठी सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (From the first over in ODI cricket, Umran Malik started the amazing bowling.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पहिल्या वनडेत धावांचा पाऊस, किवींकडून भारताचा धक्कादायक पराभव, फलंदाजांनी कमावलं पण गोलंदाजांनी गमावलं
वनडे क्रिकेटमध्ये शुबमन गिलचा धुमाकूळ! फिफ्टीबरोबरच केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड नावावर, आकडेवारी पाहाच






