यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात किवी कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याचा निर्णय योग्य वाटला. पहिल्या 10 षटकांत 67 धावा काढल्यानंतर किवी संघ मजबूत स्थितीत दिसत होता. त्यानंतर रोहित शर्माने गोलंदाजीत बदल केला आणि कुलदीप यादवला आक्रमणात आणले. यानंतर सामना उलटला.
कुलदीपने त्याच्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर धोकादायक दिसणाऱ्या रचिन रवींद्रला बाद केले. कुलदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात अनुभवी केन विल्यमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात 14 चेंडूत 11 धावा करून विल्यमसन बाद झाला.विल्यमसन बाद झाला तेव्हा संघाचा स्कोअर 75 धावांवर होता. विल्यमसनची विकेट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती कारण तो संघाच्या धावसंख्येला पुढे नेण्यासाठी सहजपणे एकेरी आणि दुहेरी धावा करतो. अशा परिस्थितीत त्याची विकेट खूप महत्त्वाची होती.
आतापर्यंत एकदिवसीय स्वरूपात, केन विल्यमसनला कुलदीपविरुद्ध धावा काढण्यात संघर्ष करताना दिसून आला आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये कुलदीपविरुद्ध आतापर्यंत 58 चेंडूंचा सामना केला आहे, ज्यामध्ये तो फक्त 55 धावा करू शकला आहे. ज्यात कुलदीपने त्याला 3 वेळा बादही केले आहे. कुलदीपविरुद्ध विल्यमसनचा सरासरी 18.33 आणि स्ट्राईक रेट 80.88 आहे. या फॉरमॅटमध्ये कुलदीपने आतापर्यंत केन विल्यमसनवर वर्चस्व गाजवले आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, किवी संघाने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना भारताने शानदार सुरुवात केली आहे. याबातमीखेरीस रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर संघाने 11 षटकांत नाबाद 66 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
न्यूझीलंडची दमदार कामगिरी; फायनलमध्ये मोडला ‘या’ संघाचा विक्रम
IND vs NZ Final: डेरिल मिचेलने अर्धशतक झळकावून रचला इतिहास! दिग्गजांच्या यादीत एँट्री
विराटने मिठी मारली की रिटायरमेंट पक्की! पहा फोटो काय सांगतायेत?