न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटीत भारताचा 25 धावांनी पराभव करत मालिका 0-3 अशी खिशात घातली. मुंबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफबद्दल मत व्यक्त केले. त्याने सांगितले की ते नुकताच आले आहेत आणि समजून घेत आहे. टी20 विश्वचषक 2024 नंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. यानंतर गौतम गंभीरने ही जबाबदारी स्वीकारली. त्याच्या नेतृत्वाखालील नवीन कोचिंग स्टाफमध्ये रायन टेन डोश्चे आणि अभिषेक नायर यांचा समावेश आहे.
कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “कोचिंग स्टाफ चांगला आहे. ते नुकतेच आले आहेत. ते अजूनही खेळाडूंना आणि संघ कसे काम करतात हे समजून घेत आहेत. त्यांच्यासाठी गोष्टी सुलभ करणे ही खेळाडूंची जबाबदारी आहे.” न्यूझीलंड संघाने बंगळुरूमधील पहिली कसोटी आठ गडी राखून जिंकली. यानंतर पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड संघाने 113 धावांनी विजय मिळवला. आता पाहुण्या संघाने मुंबईतील तिसरी कसोटी 25 धावांनी जिंकली.
भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून खेळवली जाईल. तिसऱ्या कसोटीनंतर जेव्हा रोहितला विचारण्यात आले की, ऑस्ट्रेलियन परिस्थितीत युवा फलंदाजांसाठी किती कठीण असेल, तेव्हा तो म्हणाला, ” आम्ही याबद्दल खूप बोलतो. योग्य मानसिकता राखणे आव्हानात्मक असणार आहे. जे कोणी ऑस्ट्रेलियात खेळले नाही त्यांच्यासाठी हे आव्हान असेल. त्यांना सुरक्षित वाटेल आणि ते कुठे आणि कोणाविरुद्ध खेळत आहेत याची भीती वाटू नये, असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे.”
भारत मोठ्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. मागील दोन मालिका भारतीय संघाने जिंकल्या असून, मालिका विजयाची हॅट्रिक करण्याची संधी त्यांच्याकडे असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझे आणि माझ्या कुटुंबाचे…”, राजस्थान रॉयल्सने रिलीज केल्यानंतर बटलरची भावनिक पोस्ट
रोहित आणि विराटने निवृत्त व्हावे; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल
वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग