न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला उद्यापासून (6 फेब्रुवारी) सुरूवात होत आहे. यातील पहिला सामना वेलिंगटनला खेळला जाणार आहे.
भारताने याआधीच न्यूझीलंड विरुद्ध वन-डे मालिका जिंकली आहे. यामुळे भारत आता टी20 मालिकाही जिंकण्यास उत्सुक आहे. त्याचबरोबर भारताने ही टी20 मालिका जिंकली किंवा ही मालिका अनिर्णीत राहिली तर भारतीय संघ पाकिस्तानच्या एका विश्वविक्रमाची बरोबरी करेल.
भारतीय संघ मागील 10 टी20 मालिकेत अपराजीत राहिला आहे. सध्या सर्वाधिक सलग टी20 मालिकेत अपराजीत राहण्याचा विक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. ते सलग 11 मालिकेत अपराजीत होते.
पाकिस्तानचा संघ 2016च्या टी20 विश्वचषकानंतर पुढील 11 टी20 मालिकेत अपराजीत राहिला होता. त्यांची ही सलग टी20 मालिकेत अपराजीत राहण्याची मालिका नुकतीच दक्षिण आफ्रिकेने खंडीत केली आहे.
भारताने जुलै, 2017च्या विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेत पराभूत झाल्यानंतर पुढील 10 टी20 मालिकेपैकी 7 मध्ये विजय मिळवला आहे. तर 2 मालिका अनिर्णीत राहिल्या आहेत. या दोन्ही मालिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाल्या होत्या.
त्यामुळे भारत गेल्या 10 टी20 मालिकेत अपराजीत आहे. याचमुळे त्यांना पाकिस्तानच्या सलग 11 टी20 मालिकांमध्ये अपराजीत राहण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
भारताने श्रीलंके विरुद्ध 2 तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, विंडीज आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्ध प्रत्येकी एक अशा 6 टी20 मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर निदहास ट्रॉफी ही टी20 मालिकाही आपल्या नावे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनीपासून वाचण्यासाठी आयसीसीने फलंदाजांना दिला हा खास सल्ला
–एकेकाळी यो-यो टेस्टही पास न होणारा खेळाडू झाला टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू
–नुसताच खेळाडू म्हणून नाही तर कर्णधार म्हणूनही रोहित विराटला ठरणार सरस






