भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट गेल्या काही सामन्यांपासून शांत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चाहत्यांना कोहलीकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत आहे. गेल्या आठ डावांत त्याच्या बॅटमधून केवळ एकच अर्धशतक झळकले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीला नऊ हजार धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे
विराट कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार धावा करणारा फलंदाज होण्याच्या अगदी जवळ आहे. न्यूझीलंडविरुद्ध 16 ऑक्टोबरपासून चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला नऊ हजार धावा पूर्ण करण्यासाठी 53 धावांची गरज आहे. असे करण्यात तो यशस्वी झाला. तर कसोटीत नऊ हजारांहून अधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल. सचिन, द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच तो कसोटीत नऊ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा 18वा फलंदाज ठरेल.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 115 सामने खेळले आहेत आणि 8947 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 29 शतके आणि सात द्विशतकांचा समावेश आहे. त्याला 9000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी 53 धावांची गरज आहे. यासोबतच त्याने 30 अर्धशतकेही केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 254 आहे. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक दौऱ्याआधी तीन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी भारत सज्ज आहे. अशा स्थितीत विराटचा अनुभव आणि संघाप्रती असलेले समर्पण महत्त्वाचे ठरेल.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने विराट कोहलीचे कौतुक करताना सांगितले की, त्याची धावांची भूक पूर्वीसारखीच आहे आणि खेळाच्या शीर्षस्थानी एक दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही तो कामगिरी करत आहे. बॅटनेही त्याची धावा करण्याची इच्छा कमी झालेली नाही.
हेही वाचा-
IND vs NZ: पहिल्याच कसोटी सामन्यावर पावसाचं सावट! पाहा हवामान अंदाज
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटीत कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
ind vs nz; पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, 3 फिरकीपटूंना स्थान?