---Advertisement---

न्यूझीलंडचा हा मोठा खेळाडू पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता…

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 1:08 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (India Tour of New Zealand) आहे. या दौऱ्यात आतापर्यंत भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली आहे. यानंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 21 फेब्रुवारीपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला (2 Matches of Test Series) सुरुवात होणार आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेसिन रिझर्व (Basin Reserve), वेलिंग्टन (Wellington) येथे खेळण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरला (Neil Wagner) पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. कारण वॅगनर आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माची वाट पाहत आहे. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.

याचमुळे वॅगनरचा राखीव खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेन्रीला (Matt Henry) संघात सामील करण्यात आले आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली. यामध्ये ट्विटरवर पोस्ट शेअर करताना लिहिले की, “नील वॅगनर आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माची वाट पाहत आहे. त्यामुळे मॅट हेन्रीला वॅगनरचा राखीव खेळाडू म्हणून न्यूझीलंड संघात घेण्यात आले आहे. हेन्री आज संध्याकाळी वेलिंग्टनमध्ये पोहोचणार आहे.”

हेन्रीने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हेन्रीला 13 जणांच्या न्यूझीलंड संघात स्थान मिळाले नव्हते. पण जर वॅगनर पहिला कसोटी सामना खेळला नाही तर हेन्रीला त्याच्याऐवजी संघात स्थान मिळू शकते.

कसोटी सामन्यासाठी असा असेल न्यूझीलंड संघ- 

केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोलस, बीजे वॉटलिंग, कॉलिन डि ग्रँडहोम, टीम साऊथी, नील वॅगनर, ट्रेंट बोल्ट, एजाज पटेल, काईल जेमिसन, डेरेल मिशेल, मॅट हेन्री(पहिल्या कसोटी सामन्यासाठी नील वॅगनरसाठी राखीव खेळाडू)

कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा.

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक-

पहिला कसोटी सामना – 21-25 फेब्रुवारी, पहाटे 4 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) – बेसिन रिझर्व, वेलिंग्टन.

दुसरा कसोटी सामना – 29 फेब्रुवारी – 4 मार्च, पहाटे 4 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) – हेगले ओव्हल, काईस्टचर्च.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---