भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची काल (11 ऑक्टोबर) शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या खेळाडूच्या नावाचा पुन्हा समावेश करण्यात आलेला नाही. हा खेळाडू बऱ्याच काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. पण तरीही बीसीसीआयने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली. न्यूझीलंड मालिकेतही या खेळाडूकडे दुर्लक्ष केले. हा खेळाडू दुसरा कोणी नसून अभिमन्यू ईश्वरन आहे. अभिमन्यू ईश्वरन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. टीम इंडियामध्ये सामील होण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.
अभिमन्यू ईश्वरन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील अभिमन्यू ईश्वरनच्या कारकिर्दीवर एक नजर टाकायचे झाल्यास, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 98 सामन्यांच्या 167 डावांमध्ये 7506 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरीही 49.38 इतकी राहिली आहे. जे खूपच अप्रतिम आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 26 शतके आणि 29 अर्धशतकेही केली आहेत.
अभिमन्यूने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. नुकत्याच झालेल्या इराणी चषकातही त्याने चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा टीम इंडियाच्या संघात समावेश होण्याची अपेक्षा होती. पण संघ निवडकर्त्यांनी त्याचा विचार केला नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
हेही वाचा-
हाँगकाँग सिक्सेस सपर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, माजी सलामीवीर कर्णधाराच्या भूमिकेत
women’s t20 world cup; ऑस्ट्रेलियाचा दणका, पाकिस्तान बाहेर..?, भारताचा मार्ग सुककर!
बीसीसीआयमुळे आरसीबीला करोडोंचा फायदा! मेगा लिलावापूर्वी बंगळुरुसाठी आनंदाची बातमी