भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना पार पडला. सोमवारी (६ डिसेंबर) सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय मिळवला. पहिल्या कसोटी सामन्यात भारतासाठी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यर याने जबरदस्त प्रदर्शन केले होते. त्याने दुसऱ्या सामन्यातम छोटी, पण आक्रमक खेळी केली. अय्यरने ८ चेंडूच १४ धावा केल्या, यामध्ये त्याने दोन षटकार मारले. अय्यरने मारलेल्या या दोन षटकारांनंतर कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
अय्यरने दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात ८ चेंडूत १४ धावांची छोटीशी खेळी केली, पण यादरम्यान त्याने मारलेल्या सलग दोन षटकारांसाठी त्याचे अनेकांनी कौतुक केले. त्याने हे दोन षटकार न्यूझीलंडचा नवखा फिरकी गोलंदाज विल्यम समरविलच्या गोलंदाजीवर मारले.
भारताच्या दुसऱ्या डावात समरविल ६१ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. त्यांवेळी स्ट्राइवर श्रेयस अय्यर होता आणि नॉन स्ट्राइकवर कर्णधार विराट कोहली होता. या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर अय्यरने दोन लागोपाट षटकार मारले. अय्यरने हे षटकार मारल्यानंतर विराटचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्याने ज्याप्रकारची प्रतिक्रिया दिली होती, चाहत्यांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1467398089593872386
त्याव्यतिरिक्त भारताच्या जयंत यादवने देखील जेव्हा एजाज पटेलच्या गोलंदाजीवर लॉन्ग ऑनच्या दिशेने एक षटकार मारला, तेव्हाही विराटची ड्रेसिंग रूममधील प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. विराट यावेळी जयंतने षटकार मारल्यानंतर हैराण असल्याचे पाहायला मिळाले. जयंत यादवने सामन्याच्या दुसऱ्या डावात ११ चेंडूत ६ धावा केल्या. दरम्यान, एजाज पटेलेने श्रेयस अय्यर आणि जयंत यादव या दोन्ही खेळाडूंना बाद केले.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1467408314183028738
दरम्यान, उभय संघांतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या, प्रत्युत्तरा न्यूझीलंड संघ पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने सात विकेट्सच्या नुकसानावर २७६ धावा केल्या आणि डाव घोषित केला. अशाप्रकारे भारताने न्यझीलंडला विजयासाठी ५४० धावांचे मोठे आव्हान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ १६७ धावांवर बाद झाला आणि भारताने ३७२ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
ना गांगुली, ना धोनी; ‘यापूर्वीही सांगितलंय, आताही सांगतोय कोहलीच कसोटीतील सर्वश्रेष्ठ कर्णधार’
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा विजयाने शेवट, त्यानंतर टीम इंडिया केव्हा खेळणार पुढील सामना? घ्या जाणून