भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0ने आघाडी घेत मालिका खिशात घातली. मात्र, या सामन्यात भारताला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर संघाचे स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी फक्त प्रत्येकी 6 षटके गोलंदाजी केली. याबाबत कर्णधार रोहित शर्मा याला विचारणा केली असता, त्याने यामागील मोठे कारण सांगितले.
काय म्हणाला रोहित?
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांच्याविषयीच्या प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणाला की, “मागील 5 सामन्यात गोलंदाजांनी खरंच चांगली कामगिरी केली. आम्ही त्यांच्याकडून जे काही मागितले, त्यांनी पुढे येऊन दिले आहे. तुम्ही साधारणत: भारतात अशाप्रकारची वेगवान कामगिरी पाहत नाही. विशेषत: ही कामगिरी भारताबाहेरील खेळपट्टीवर पाहायला मिळते. जेव्हा आम्ही काल सराव केला, तेव्हा चेंडू चांगल्याप्रकारे येत होता. तसेच, चेंडू प्रकाशाच्या खाली येत होता. मात्र, त्यांनी 250 धावा केल्या असत्या, तर आमच्यासाठी खूप कठीण झाले असते. जसे की, मी आधी म्हणालो, आम्ही पहिल्या सामन्यात फलंदाजी केली. मात्र, या सामन्यात आम्हाला धावांचा पाठलाग करायचा होता.”
.@ShubmanGill finishes things off in style! #TeamIndia complete a comprehensive 8️⃣-wicket victory in Raipur and clinch the #INDvNZ ODI series 2️⃣-0️⃣ with more game to go 🙌🏻
Scorecard ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ @mastercardindia pic.twitter.com/QXY20LWlyw
— BCCI (@BCCI) January 21, 2023
“एक कारण असेही आहे की, आम्हाला विश्वचषकापूर्वी आव्हाने स्वीकारायची आहेत. आम्हाला हे पाहायचे आहे की, आम्ही कोणत्या गोष्टीत काम करायचे आहे. आम्ही मागील 5 सामन्यात सर्व प्रयत्न केले आहेत. आम्हाला याचे निकालही मिळाले आहेत. संघाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि मला आशा आहे की, हे पुढेही कायम राहील,” असेही पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला.
‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी काळजी घेण्याची गरज’
प्रेझेंटर मुरली कार्तिक याने सामन्यादरम्यान रोहितला विचारले की, जेव्हा 15 धावांवर 5 विकेट्स पडल्या, त्यानंतर सिराज आणि शमीला गोलंदाजी न देण्याचा निर्णय कसा काय घेतला? त्यावर रोहितने उत्तर देत म्हटले की, “ज्याप्रकारे खेळपट्टी होती, त्यानुसार ते पुढे जाऊन मोठ्या गोलंदाजीसाठी उतावळे होते. मात्र, मी त्यांना म्हणालो की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकाही येत आहे. अशात आम्हाला स्वत:ला सांभाळण्याची गरज आहे. मी त्यांना म्हणालो, बॉस दुसरे गोलंदाजही आहेत.” रोहितने त्याच्या फलंदाजीबद्दल म्हटले की, “मोठी धावसंख्या होत नाहीये, परंतु मी माझ्या फलंदाजीने खुश आहे.”
शमीची आणि सिराज गोलंदाजी
शमी आणि सिराजच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर शमीने या सामन्यात 6 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच, सिराजने 6 षटके गोलंदाजी करत 10 धावा देत 1 विकेट्स घेतली. या गोलंदाजांमुळे भारताला न्यूझीलंड संघाला 108 धावांवर रोखण्यात यश आले. भारताने हा सामना 20.1 षटकात 2 विकेट्स गमावत 111 धावा करत नावावर केला. (ind vs nz why pacer mohammed shami and mohammed siraj bowl only 6 overs captain rohit sharma told reason)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितने पुन्हा दाखवून दिलं त्याला ‘हिटमॅन’ का म्हणतात, भारताच्या वनडे विजयात गांगुलीपेक्षाही जास्त योगदान
जोडी जबरदस्त! रोहित-गिलने 2023मध्ये गाजवलं वनडे क्रिकेट, 5 डावांमध्ये ठोकल्या चारशेहून अधिक धावा