भारतीय संघ आगामी आशिया चषकाच्या तयारीत आहे. आशिया चषक २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार असून भारताला २८ ऑगस्ट रोजी अभियानाची सुरुवात करायची आहे. पहिल्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ असेल. याच पार्श्वभूमीवर संघातील सर्वजण कसून सारवा करत आहेत. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एकपेक्षा एक कडक शॉट्स खेळताना दिसतो.
रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय संघाचा आता नियमित यष्टीरक्षक बनला आहे. त्याने संघासाठी नेहमीच महत्वाची भूमिका पार पाडली असल्यामुळे त्याला खूपच कमी वेळा संघातून बाहेर ठेवल्याचे दिसते. आशिया चषका २०२२ मध्येही त्याची भूमिका महत्वाची असेल. फलंदाजी आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तो संघासाठी चमकदार कामगिरी करेल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. बीसीसीआयने सराव सत्रातील जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये पंत जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसते. त्याच्या बॅटमधून एकापेक्षा एक उत्कृष्ट शॉट्स निघाले, ज्याचा आवाज कोणत्याही क्रिकेटप्रेमीला खुश करणारा आहे.
Whack Whack Whack at the nets 💥 💥, courtesy @imjadeja & @RishabhPant17 👌👌#TeamIndia | #AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/FNVCbyoEdn
— BCCI (@BCCI) August 26, 2022
तसे पाहिले तर भारतीय संघ नेहमीच पाकिस्तानवर भारी पडत आला आहे. परंतु मागच्या काही वर्षांमध्ये परिस्थितीत बदलल्याचे दिसते. पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांच्या प्रदर्शनात लक्षणीय सुधारणा केली आहे. मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने पहिल्यांदाच एखाद्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा धूळ चारली होती. यापूर्वी भारत एकदाही विश्वचषकात खेळताना पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता. आता आशिया चषकात भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांचे प्रमुख वेगवान गोलंदाज आशिया चषक खेळत नाहीयेत. भारताचा जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी दोघांनाही आशिया चषकापूर्वी दुखपत झाली असून संपूर्ण स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून
मुंबईचे क्रीडापटू मयूर व्यास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या ‘लाइफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स’ ने गौरव
सरावानंतर विराट भेटला पाकिस्तानच्या फॅनला, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील