---Advertisement---

‘भाऊ मस्त खेळला!’, विराटच्या कौतुकात सूर्यकुमार यादवचे हटके ट्वीट चर्चेत

Virat-Kohli-And-Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून टी-20 विश्वचषक 2022 ची सुरुवात विजायाने केली. उभय संघांतील हा बहुप्रतिक्षित सामना रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. भारताने या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आणि विश्वचषकाची सुरुवात गोड केली. विराट कोहली भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वात महत्वाचे प्रदर्शन करू शकला. त्याने  नाबाद 82 धावा केल्या आणि सामनावीर देखील ठरला. विराटचा सहकारी खेळाडू सूर्यकुमार यादव याने एक हटके पोस्ट करून त्याचे कौतुक केले आहे. 

भाराताने या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये जबरदस्त प्रदर्शन करून पाकिस्तानची धावगती संथ केली होती, पण शेवटच्या षटकांमध्ये पाकिस्तानने चांगले पुनरागमन केले. पाकिस्तानने मर्यादित 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावा केल्या. प्रत्युत्तरा भारताने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. विराट कोहली (Virat Kohli) याने 53 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 82 धावांची नाबाद खेळी केली. या वादळी खेळीसाठी सोशल मीडियावर विराटचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पण या सर्व पोस्टमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने केलेली पोस्ट हटके आहे. कारण त्याने विराटचे कौतुक मराठीत केले आहे.

सूर्यकुमारने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून विराटचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “मानला रे भाऊ.”  ‘भाऊ’ हा शब्द शक्यतो महाराष्ट्रात आणि त्यातही प्रामुख्याने मराठी लोकांमध्ये वापरला जातो. काही दिवसांपूर्वी विराटने सूर्यकुमारसाठी विराटने एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये विराटने सूर्यकुमारसाठी ‘भाऊ’ शब्द वापरला होता. विराटची ही पोस्ट देखील चांगलीच चर्चेत राहिली होती. माहितीनुसार सूर्यकुमारला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये भाऊ नावानेच बोलवले जाते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: वडिलांची आठवण येताच हार्दिकच्या अश्रूंचा फुटला बांध; इरफानच्या गळ्यात पडत धाय मोकलून रडला
सौरव गांगुलीची भविष्यवाणी! ‘हे’ संघ गाठणार टी20 विश्वचषकाची उपांत्यफेरी 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---