---Advertisement---

आशिया चषकापेक्षा टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढली, मोडीत निघाले सर्व विक्रम

On: सोमवार, ऑक्टोबर 24, 2022 6:41 PM
Team-India
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. पाकिस्तानने विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. पण रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव करून विराट कोहलीच्या वादळी खेळीचे चीज केले. भारातने चार विकेट्स राखून हा सामना जिंकला. दरम्यान, हा सामना लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती, ज्याने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 

रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना पाहण्यासाठी 90,000 हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. ही आकडेवारी खरोखर थक्क करणारी म्हणता येईल. तसेच हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर पाहणाऱ्यांनी देखील विक्रम केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महामुकाबला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीडी प्लॅटफॉर्मवर 1.8 कोटी प्रेक्षक एका वेळी पाहत होते.

भारतात टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स चॅनलवर पाहिला जाऊ शकत होता. टीव्हीवर एकूण किती चाहत्यांनी हा सामना पाहिला, याची आकडेवारी एक आठवड्यानंतर समोर येईल. टेलिव्हिजन ऑडियंस मेजरमेंट बॉडी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल म्हणजेच बार्क (BARC) या संस्थेकडून ही माहिदी जाहीर केली जाईल. टीव्हीवर लाईव्ह सामना पाहणाऱ्यांची माहिती अद्याप समोर आली नसली, तरी डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारवरने मात्र त्यांची आकडेवारी जाहीर केली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेला सामना पाहण्यासाठी कोट्यावधी चाहत्यांनी डिज्नी प्लस हॉटस्टार ऍप वापरले होते. पण रविवारी टी-20 विश्वचषकात जेव्हा हे संघ एकमेकांशी भिडले, तेव्हा आशिया चषकापेक्षाही जास्त चाहते हा सामना हॉटस्ट्रा ऍपवर पाहत होते. आशिया चषकात या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांना 1.4 कोटी चाहते लाईव्ह पाहत होते. पण रविवारी उभय संघांतील हा सामना 1.8 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमार पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी आला, तेव्हा 36 लाख चाहते हॉटस्टारवर लाईव्ह सामन्याचा आनंद घेत होते. त्यानंतर जेव्हा पाकिस्तानचा डाव संपला, तेव्हा 1.1 कोटी चाहते सामन्याचा आनंद घेत होते. भारतीय संघ फलंदाजीला येण्यापूर्वी मधल्या वेळेत 1.4 कोटी चाहते लाईव्ह सामना पाहत होते. भारतीय संघ लक्ष्या पाठलाग करण्यासाठी मैदानात आला, तेव्हा सुरुवातीला 40 लाक चाहते सामना पाहत होते. शेवटच्या षटकांमध्ये मैदानात दबावाचे वातावरण होते आणि विराट कोहली जबरदस्त प्रदर्शन करत असताना मात्र विक्रमी 1.8 कोटी चाहत्यांनी लाईव्ह सामना पाहिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेसाठी पाऊस पुन्हा विलन! झिम्बाब्वेच्या वेळकाढूपणामुळे सामना रद्द; डी कॉकची तुफान फलंदाजी
विश्वचषकांमध्ये विराटचं झळकतो! डिविलियर्सला मागे टाकत केला ‘हा’ अनोखा रेकॉर्ड 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---