भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत. टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) 16 ऑक्टोबर रोजी सुरू झाला असून भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. उभय संघांतील हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयोजित केला गेला आहे. हा सामना पाहण्यासाठी जवळपास एक लाख प्रेक्षक मैदानात येण्याची शक्यता आहे. पण या सर्वांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील या विश्वचषक सामन्यासाठी जगभरातील कोट्यावधी चाहते वाट पाहत आहे. पण ऐन सामन्याच्या दिवशी या सर्वांची निराशा होऊ शकते. कारण या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी मेलवर्नमध्ये (Melbourne Cricket Ground) पावसाची पूर्ण शक्यता सांगितली गेली आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे चाहत्यांनी आधीच या सामन्यासाठी नियोजन करू ठेवले आहे, पण त्यांच्या नियोजनावर पाणी घेरले जाण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार मेलबर्नमध्ये 21 ऑक्टोबरपासून पाऊस सुरू होणार आहे.
21 ऑक्टोबर रोजी पाऊस येण्याची 65 टक्के शक्यता सांगितली जात आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस देखील पाऊस येणार नाहीये. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी याठिकाणी पाऊस येण्याची एक टक्का देखील शक्यता नाही, असे सांगितले गेले आहे. पण त्यानंतर गुरुवारी रात्री रिमझिम पाऊस सुरू होईल. हा पाऊस पुढचे तीन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकिट खरेदी केलेल्या चाहत्यांची मोठी निराशा होणार, असेच दिसते. तसेच घरी वसून सामना पाहण्याचे नियोजन केलेल्यांची परिस्थिती देखील काही वेगळी नसेल.
दरम्यान, हवामान अंदाजाच्या माहितीनुसार सामन्याच्या दिवशी पाऊस येण्याची 96 टक्के शक्यता आहे. 22 ऑक्टोबर रोजीही हे वातावरण असेच कायम राहिण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबर रोजी पुन्हा जोरदार पाऊस होईल. आकाशात पूर्णपणे ढगाळ वातावरण असेल. याच कारणास्तव वेगवान गोलंदाजांना या मैदानात काही प्रमाणात स्वीग आणि सीम मिळण्याचीही शक्यता आहे. असे असले तरी, सामना झाला, तर चाहत्यांसाठी ही चांगलीच बाब असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कॅम्फरच्या धमाक्याने आयर्लंडचे विश्वचषकातील आव्हान जिवंत! स्कॉटलंडविरूद्ध सर केला धावांचा डोंगर
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर






