---Advertisement---

जोहान्सबर्ग कसोटीत कोणीही जिंको, इतिहास तर घडणार! का? वाचा सविस्तर

On: गुरूवार, जानेवारी 6, 2022 7:10 PM
Virat-Kohli-Dean-Elgar
---Advertisement---

भारत आणि दक्षिण अफ्रिकेतील (sa vs ind test series) दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या डावात विजयासाठी अजून १२२ धावांची आवश्यकता आहे. अशात भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांना विजयाची अपेक्षा आहे. दरम्यान, या स्टेडियमचा इतिहात पाहता, याठिकाणी भारतीय संघ नवीन विक्रम करणार, यात शंका वाटत नाही.

जोहान्सबर्गमध्ये भारताने आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. यापूर्वी भारताने या मैदानावर पाच कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी दोनमध्ये विजय मिळवला, तर तीन सामने अनिर्णीत राहिले. २०१८ मधील दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताने कसोटी मालिका गमावली होती, पण या मैदानावरील कसोटी सामना जिंकला होता. अशात सध्या जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेला कसोटी सामन्यात भारत पराभूत झाला, तरी एकप्रकाराचा विक्रमच घडणार आहे. कारण, हा भारताचा या मैदानावर पराभूत झालेला पहिला कसोटी सामना असेल.

दुसरीकडे, जर भारताने या सामन्यात विजय मिळवला, तर संघ कसोटी मालिकाही जिंकेल. भारताने दक्षिण अफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशात भारतीय संघाकडे इतिहास घडवण्याची संधी आहे. तसेच भारत या विजयानंतर पहिला आशियाई देश असेल, ज्याने सेना देशांमध्ये (SENA) म्हणजेच दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली.

दरम्यान, भारताने जोहान्सबर्गमध्ये तीन वर्षापूर्वी खेळलेल्या कसोटी सामन्यात आणि सध्या सुरू असेल्या सामन्यात खूप साम्य पाहायला मिळत आहे. तीन वर्षांपूर्वीच्या सामन्यात शेवटच्या डावात दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यावेळी दक्षिण अफ्रिका संघाची चौथ्या दिवशीची धावसंख्या एक विकेटच्या नुकसानावर १२४ धावा होती. परंतु, पाचव्या दिवशी भारताच्या मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने दक्षिण अफ्रिकी संघ अडचणीत आला आणि भारतीय संघ विजयी झाला. कर्णधार डीन एल्गरने या सामन्यात महत्वापूर्ण खेळी केली होती.

तर सध्या सुरु असेलेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या डावात २४० धावांचे लक्ष्य मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेची धावसंख्या दोन विकेट्सच्या नुकसानावर ११८ आहे. विजयासाठी त्यांना अजून १२२ धावांची आवश्यकता आहे. कर्णधार डीन एल्गन ४६ धावांसह खेळपट्टीवर कायम आहे. भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या डावात अजून आठ विकेट्स घ्याव्या लागतील. चौथ्या दिवशीच्या खेळात पावसामुळे बाधा आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Video: लाईव्ह कार्यक्रमात भिडले ॲलिस्टर कूक आणि मोईन अली; त्यानंतर जे झाले ते पाहा

वनडे कर्णधारपदाच्या विवादात रवी शास्त्रींची एन्ट्री; म्हणाले, ‘कोहलीने त्याची बाजू मांडलीय, आता गांगुली…’

कोरोनामुळे भारतीय देशांतर्गत स्पर्धा स्थगित; बीसीसीआय अध्यक्ष गांगुली म्हणाले, ‘आयोजनासाठी सर्वकाही करू’

व्हिडिओ पाहा –

डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत । What Is VJD Method Of Cricket?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---